नवी दिल्ली - राज्यात कोरोनाचे संकट अतिगंभीर रूप धारण करून उभे असतानाच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थैर्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार आपले नाही, असे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता हे विधान ताजे असतानाच काँग्रेसच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नेत्यांतल धुसफूस उघड होऊ लागली आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी राज्य सरकारच्या कारभारावर तोफ डागली आहे. ‘’आमचे तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार कोरोनाचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता हळूहळू या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री सरकार आपल्या मर्जीने चालवत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपला निर्णय घेतला पाहिजे. तसेच सध्या राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्याला शिवसेना जबाबदार आहे. तर मुंबईची वुहान होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे,’’ असे निरुपम म्हणाले.
स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न सोडवण्यामध्येही महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जर केंद्र सरकार यादी मागत असेल, तर आमचे सरकार त्यांना ती यादी देत का नाही हा प्रश्न आहे. ही यादी त्वरित दिली गेली पाहिजे होती, असेही निरुपम यांनी सांगितले. मात्र निरुपम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र कौतुक केले.
जर काँग्रेसने आताच या सरकारपासून योग्य अंतर ठेवले नाही तक पक्षाला जनतेला उत्तरे द्यावी लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्याही सल्ल्याविना मनमानी कारभार करत आहेत. मुंबईवर ओढवलेल्या या परिस्थितीसाठी आमचे सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्राची स्थिती बिघडण्यासाठी सर्वात जास्त शिवसेना जबाबदार आहे. तरीही मुख्यमंत्री अहंकाराने वागत आहेत. हा कुठला अहंकार आहे. त्याचे कारण काय आहे, असा सवालही निरुपम यांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी
लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त
चिंताजनक! अॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात
पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप