राज्य सरकारने दिली कंत्राटदारांना क्लीन चिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:06 AM2018-09-12T05:06:23+5:302018-09-12T05:06:26+5:30
मुुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली २०३०पर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला सांगितले.
मुंबई : मुुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली २०३०पर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला सांगितले. सोबतच कंत्राटदारांनी नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट करत त्यांना क्लीन चिट दिली.
सुमित मल्लिक यांच्या समितीच्या अहवालानुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून रोज ९३,५८२ वाहने ये-जा करतात. तर एमएसआरडीसीने पुण्याच्या मुख्य अभियंत्याद्वारे केलेल्या वाहतूक सर्वेक्षणानुसार या एक्स्प्रेस-वेवरून रोज १,३०,४०२ वाहने ये-जा करतात. कंत्राटदारांच्या मते ही संख्या १,२६,८३९ इतकी आहे. सरकारच्या आणि कंत्राटदाराच्या वाहनांच्या आकडेवारीत ३ टक्क्यांची तफावत आहे. कारण पुण्याच्या मुख्य अभियंत्यांनी किती वाहनांना टोलमधून सवलत दिली, याची नोंद केली नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी नियमांचे उल्लंघन केले नाही, असे सांगत सरकारने त्यांना क्लीन चिट
दिली.