राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय?

By मुकेश चव्हाण | Published: January 6, 2021 02:25 PM2021-01-06T14:25:58+5:302021-01-06T14:26:03+5:30

शिवसेनेची आणि भाजपची १९९५ मध्ये युती झाल्यानंतर युती सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती.

state government has decided to uphold the decision to waive the entertainment tax on Michael Jackson's program | राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय?

राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय?

googlenewsNext

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या  प्रसिद्ध पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या झालेल्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क परत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मायकल जॅक्सन याच्या कार्यक्रमावरील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे ठाकरे सरकारने निश्चित केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (बुधवारी) होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

शिवसेनेची आणि भाजपाची १९९५ मध्ये युती झाल्यानंतर युती सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती. मुंबई उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले होते. मात्र आता तब्बल २५ वर्षांनंतर या निर्णयावर सुनावणी होणार आहे.

१९९६ साली जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनच्या शोच भारतात आयोजन करण्यात आले होते. विझक्राफ्ट या कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे मायकल जॅक्सन हा क्लासिकल सिंगर असल्याचे दाखवून या शोसाठी ३ कोटी ३४ लाखांचा करमणूक कर माफ करण्यात आला. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमुळे विझक्राफ्ट कंपनीने ३ कोटी ३६ लाखांची रक्कम कर म्हणून न्यायालयात जमा केली होती. 

याचिकेमुळे विझक्राफ्ट कंपनीने ३ कोटी ३६ लाखांची रक्कम कर म्हणून न्यायालयात जमा केली होती. करमणूक कर माफ करणाऱ्या युती सरकारला उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. विजक्राफ्ट या कंपनीने करमणूक करेची रक्कम परत करवी यासाठी राज्य सरकारकडे अर्जही करण्यात आला होता. त्यामुळे २५ वर्षांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत विजक्राफ्ट कंपनीला करमणूक कराच्या रकमेत सुट मिळण्यासाठी प्रस्ताव येणार असून त्यावर योग्य निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने आज करमाफीचा निर्णय घेतल्यास या कॉन्सर्टची व्यवस्थापक असणाऱ्या विझक्राफ्ट कंपनीला तिकीट विक्रीतून मिळालेली ३.३६ कोटी रुपयांचे रक्कम परत मिळेल. ही रक्कम सध्या न्यायालयाच्या अखत्यारित असणाऱ्या ट्रेझरी विभागाकडे आहे.

Web Title: state government has decided to uphold the decision to waive the entertainment tax on Michael Jackson's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.