लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार; रेल्वेमंत्री गोयल म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 04:18 AM2020-10-04T04:18:18+5:302020-10-04T07:01:16+5:30

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी रेल्वेची सेवा बंद आहे. लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

state government has not sent proposal to start local says piyush goyal | लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार; रेल्वेमंत्री गोयल म्हणतात...

लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार; रेल्वेमंत्री गोयल म्हणतात...

googlenewsNext

मुंबई : लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून मागणी करण्यात आली नाही, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी रेल्वेची सेवा बंद आहे. लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रेल्वे प्रशासनाशी यासंदर्भात सरकारचे बोलणे सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, अनलॉकच्या सुरू झालेल्या टप्प्यांमध्ये मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत अजून तरी कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारकडून मला प्राप्त झालेली नाही. मागणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे मुंबई लोकल नेमकी कधी सुरू होईल, याबाबत संभ्रम कायम आहे.

Web Title: state government has not sent proposal to start local says piyush goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.