राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी जाणार संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 05:16 AM2019-01-23T05:16:34+5:302019-01-23T05:16:40+5:30
राज्य शासनातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २९ व ३० जानेवारीला राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.
मुंबई : राज्य शासनातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २९ व ३० जानेवारीला राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. अनुकंपावरील सेवा भरती विनाअट करण्याच्या प्रमुख मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने संपाचे हत्यार उपसत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.
पठाण म्हणाले, अनुकंपा सेवा भरतीसह चतुर्थ श्रेणीमधून तृतीय श्रेणीमध्ये २५ टक्क्यांऐवजी ५० टक्के पदोन्नतीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची पदे कमी करू नयेत, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचे खासगीकरण थांबवावे. कायमस्वरूपी कामासाठीही शासनाकडून ठेकेदारी पद्धतीने कामे दिली जात आहेत. याउलट वर्षानुवर्षे ठेकेदारी पद्धतीने काम करणाºया कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घेण्याची गरज आहे. महसूल विभागातील कोतवाल पदावर काम करणाºयांना टक्केवारी न लावता थेट शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा दर्जा देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. या मागण्यांसाठीच २९, ३० जानेवारीला कामबंद आंदोलन करण्यात येईल.
>कर्मचाºयांच्या मागण्या
सवलतीच्या किमतीत स्वत:चे घर व्हावे यासाठी गृहखात्याप्रमाणे त्यांना वसाहत बांधून मिळावी.
सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाºयांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे.
आरोग्य खात्यामध्ये १९८१ पासून बदली तत्त्वावर कार्यरत असलेल्या ६६४ कर्मचाºयांना शासकीय सेवेत कायम करावे.