पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव स्पष्ट दिसत होता, महाविकास आघाडीकडून दडपशाही : प्रविण दरेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:05 PM2022-04-04T18:05:33+5:302022-04-04T18:10:22+5:30

पोलिसांच्या सूचनेनुसार, सोमवारी प्रविण दरेकर सकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

State government s pressure on police bjp leader targets mahavikas aghadhi will go again if police needed mumbai jelha madhyavarti bank | पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव स्पष्ट दिसत होता, महाविकास आघाडीकडून दडपशाही : प्रविण दरेकर 

पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव स्पष्ट दिसत होता, महाविकास आघाडीकडून दडपशाही : प्रविण दरेकर 

Next

"महाविकास आघाडी सरकारची दडपशाही सुरू आहे. त्यातूनच भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. अशाच प्रकारे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका प्रकरणात माता रमाबाई आंबडेकर मार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपली सुमारे साडेतीन तास चौकशी केली. पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आपण पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली," अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

पोलिसांच्या सूचनेनुसार, सोमवारी प्रविण दरेकर सकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले. दरेकर यांची सुमारे साडेतीन तास पोलिसांनी चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "पोलीस तेच-तेच प्रश्न उलटसुलट पद्धतीने विचारत होते. पोलिसांनी यावेळी नियमबाह्य प्रश्न विचारण्याचाही प्रयत्न केला. चौकशीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे आपल्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासात जेवढे गरजेचे होते तेवढी सर्व माहिती आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिली. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्या चौकशीची स्थिती मॉनिटर करत होते," असं दरेकर म्हणाले. पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

"माझी चौकशी सुरू असताना, चार पाच वेळेला पोलीस निरीक्षक आतमध्ये अँण्टी चेंबर्समध्ये ये-जा करित होते व फोनवर बोलत होते. पण त्यांना नेमके कोणाचे फोन होते हे समजू शकले नाही. माझा फोन चार्जिंगसाठी बंद करून ठेवला होता. परंतु माझा समज झाला होता की माझा फोन काढून बंद केला," असेही त्यांनी सांगितले.

बोलावल्यास पुन्हा जाऊ
पोलिसांना या प्रकरणात माझी पुन्हा चौकशी करण्याकरिता पुन्हा आवश्यकता वाटल्यास बोलाविल्यास आपण पोलीस ठाण्यात पुन्हा जाऊ. पोलिसांना जे-जे सहकार्य हवे असेल ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचंही दरेकर यांनी स्पष्ट केलं.

Web Title: State government s pressure on police bjp leader targets mahavikas aghadhi will go again if police needed mumbai jelha madhyavarti bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.