Join us

राज्य शासनाने मंगल कार्यालयासंदर्भात नियमावली तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्वांत मोठा फटका हा लग्नसराई व्यवसायाला बसला आहे. या लॉकडाऊनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्वांत मोठा फटका हा लग्नसराई व्यवसायाला बसला आहे. या लॉकडाऊनमुळे आतापर्यंत ४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र आता कोरोना वाढीस लागल्याचे कारण पुढे करीत मुंबईतील मंगल कार्यालये ही सध्या मुंबई महापालिकेकडून टार्गेट केली जात आहेत. यामुळे राज्य सरकारने मंगल कार्यालयाबाबत नियमावली तयार करावी, अशी मागणी बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनने केली आहे. कोरोना वाढीस लागल्याने लग्न सोहळ्यात आता फक्त ५० माणसे हवीत, असा फतवा मुंबई महापालिकेने काढल्याने विशेष करून लग्नाची तारीख आणि मंगल कार्यालय बुक केलेले वधू-वर मंडळी तर खूप हवालदिल झाली आहेत. तर दुसरीकडे अनेकवेळा ५० माणसांना प्रवेश दिला जाईल, असे आम्ही सांगताच आमचे व वधू-वर मंडळींचे काही वेळा खटके उडत आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सदस्य सुनील वेंगुर्लेकर यांनी दिली. याबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच साकीनाका येथील पेन्युनसूला हॉटेलमध्ये बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष योगेश चंदाराणा, सचिव सतीश कामत, खजिनदार समीर पारेख, सदस्य सुनील वेंगुर्लेकर यांच्यासह मुंबईतील इतर २४ सदस्य उपस्थित होते.