शिंदे-फडणवीस सरकार ६० हजार कोटींचे कर्ज उभारणार; एमएमआरडीएतील प्रकल्पांसाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:26 AM2022-07-17T05:26:23+5:302022-07-17T05:28:14+5:30
राज्य सरकारवर मार्च २०२२ पर्यंत ४ लाख ८९७३४ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०२३ च्या मार्चअखेर ते ५ लाख ६४६७० कोटी इतके अंदाजित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील विविध पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीसाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास एमएमआरडीएला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात साडेबारा हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार हमी देईल. एमएमआरडीएमार्फत १ लाख ७४९४० कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प उभारले जात आहेत.
राज्यावर ४.८९ लाख कोटींचे कर्ज
राज्य सरकारवर मार्च २०२२ पर्यंत ४ लाख ८९७३४ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०२३ च्या मार्चअखेर ते ५ लाख ६४६७० कोटी इतके अंदाजित आहे. अर्थात एमएमआरडीए ही सरकारच्या अखत्यारितील पण स्वायत्त संस्था असल्याने या कर्जात ६० हजार कोटी रुपयांच्या नव्या कर्जाचा समावेश नसेल. राज्य सरकारच्या सकल उत्पन्नाच्या २४ टक्के कर्ज घेण्याची अनुमती असते आणि त्या मर्यादेतच कर्ज घेण्यात आले आहे.