राज्यात रुग्ण कमी, मात्र चिंता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:07 AM2021-03-09T04:07:46+5:302021-03-09T04:07:46+5:30
दिवसभरात ८,७४४ बाधितांचे निदान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - राज्यात ८,७४४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २२ काेराेनाबाधित ...
दिवसभरात ८,७४४ बाधितांचे निदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - राज्यात ८,७४४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २२ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी दैनंदिन रुग्णांचे निदान कमी झाले असले तरी यंत्रणांसमोर चिंता मात्र कायम आहे. कारण आता राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२८,४७१ झाली असून बळींचा आकडा ५२ हजार ५०० झाला आहे.
दिवसभरात ९,०६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण २०,७७,११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२१% एवढे झाले आहे. सध्या राज्यात ९७,६३७ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण २२ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू सातारा-२ आणि ठाणे-१ असे आहेत. या २२ मृत्यूंमध्ये मुंबई ४, नवी मुंबई मनपा १, नाशिक १, सोलापूर १, सिंधुदुर्ग १, औरंगाबाद मनपा १, लातूर १, अमरावती १, अमरावती मनपा २, यवतमाळ १, नागपूर मनपा ३ इ रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६९,३८,२२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४१,७०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.