राज्य पोलिसांच्या चुकांची सीबीआय चौकशी करणार

By admin | Published: September 22, 2015 02:14 AM2015-09-22T02:14:11+5:302015-09-22T02:14:11+5:30

बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) हाती घेतल्यावर रायगड व खार पोलिसांनी आधी केलेल्या तपासातील चुका तसेच

State investigations into the CBI investigation of the mistakes | राज्य पोलिसांच्या चुकांची सीबीआय चौकशी करणार

राज्य पोलिसांच्या चुकांची सीबीआय चौकशी करणार

Next

नविन सिन्हा, नवी दिल्ली
बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) हाती घेतल्यावर रायगड व खार पोलिसांनी आधी केलेल्या तपासातील चुका तसेच त्यात राहून गेलेल्या त्रुटीही चौकशीच्या रडारवर येणार आहेत.
‘सीबीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोणताही गुन्हा न नोंदविता किंवा तपास न करता राज्य पोलिसांनी व खार पोलिसांनी शीना बोरा हिच्या हाडाचा सांगाडा तीन वर्षे कसा काय जतन करून ठेवला, यासंदर्भात या पोलीस अधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली जाऊ शकते. शीनाची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या झाली होती आणि तिचा मृतदेह जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील एका जंगलात फेकून देण्यात आला होता.
राज्य सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे शुक्रवारी ठरविले असले तरी केंद्र सरकारकडून योग्य ते निर्देश मिळाल्यानंतर हा तपास आमची मुंबई शाखा औपचारिकपणे हाती घेईल, असे ‘सीबीआय’च्या या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास हाती घेताच फॉरेन्सिक,
डीएनए आणि सेंट्रल फॉरेन्सिक
सायन्स लेबोरटरी (सीएफएसएल) तज्ज्ञांच्या अन्य अहवालांची पुन्हा
चिरफाड करण्याचे सीबीआयचे मनसुबे आहेत.
याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी, इंद्राणीचा आधीचा पती संजीव खन्ना तसेच कारचालक श्यामवर राय यांना अटक करण्यात आली असून, सध्यात ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय या तिघांच्याही कोठडीची मागणी करू शकते. इंद्राणी ही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. वरिष्ठ सूत्रांच्या मते, संपत्तीच्या कारणातून हे हत्याकांड घडले का, यादिशेनेही सीबीआय तपास करणार आहे. त्यासाठी इंद्राणीचे विद्यमान पती पीटर मुखर्जी हे सीईओ असतानाच्या कार्यकाळातील इनोक्स-मीडिया आणि स्टार टीव्हीचे सर्व आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी सीबीआय तज्ज्ञांची एक टीम स्थापन करू शकते. पीटर मुखर्जी यांचे त्यांच्या पत्नींशी संबंधित आर्थिक व अन्य व्यवहार, शीनाशी पीटर यांचे संबंध अशा अनेक अंगाने चौकशी करण्याचेही सीबीआयचे मनसुबे आहेत. याशिवाय पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल मुखर्जी तसेच शीनाचा भाऊ मिखाईल बोरा यांचीही सीबीआयकडून नव्याने चौकशी होऊ शकते. मिखाईलने इंद्राणीवर लावलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सीबीआयचे मत आहे. अद्याप शीना बोरा, या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी शिवाय पीटर मुखर्जी यांचे आर्थिक व्यवहार व बँक खात्यांची मुंबई पोलिसांनी चौकशी न करणे, हे आश्चर्यकारक असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: State investigations into the CBI investigation of the mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.