राज्यात 'खडसें पे चर्चा', भाजपाचे स्टार प्रचारक असूनही दुय्यम स्थान ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:13 PM2019-10-01T18:13:27+5:302019-10-01T18:18:10+5:30

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची स्टार प्रचारक म्हणून पक्षाने निवड केली आहे.

In the state, 'Khadse Pe charcha', BJP star campaigner eknath khadse has no ticket | राज्यात 'खडसें पे चर्चा', भाजपाचे स्टार प्रचारक असूनही दुय्यम स्थान ?

राज्यात 'खडसें पे चर्चा', भाजपाचे स्टार प्रचारक असूनही दुय्यम स्थान ?

Next

भारतीय जनता पक्षाने आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून बहुतांशी जुन्या चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. मात्र, या यादीत ज्येष्ठ नेते आणि भाजपाचे स्टार प्रचारक एकनाथ खडसे यांच नाव आलेलं नाही. तरीही, खडसेंनी आपला उमेदवारी अर्ज मुक्ताईनगर मतदारसंघातून भरला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची स्टार प्रचारक म्हणून पक्षाने निवड केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्टार प्रचारक म्हणून आपण पक्षास वेळ द्यावा, असे निवेदन करणारे पत्र 18 सप्टेंबर रोजी त्यांना पाठविले आहे. ही महत्वाची जबाबदारी त्यांना सोपविली असताना पहिल्या यादीत त्यांची उमेदवारी जाहीर होऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. खडसेंच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे खडसेंचं स्थान दुय्यम यादीत किंवा द्वितीय फळीतील नेत्यांमध्ये असल्याचं भासवण्याचा भाजपाच्या बड्या नेत्यांचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

दरम्यान असं असलं तरी एकनाथ खडसे यांनी हार मानली नसून त्यांनी आजच मुक्ताईनगर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आपण लढणार हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीरच केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदार संघातून हरीभाऊ बागडे यांना वयामुळे उमेदवारी नाकारण्यात येणार होती. परंतु, त्यांनी आपण निवडणूक लढवणारच असं नमूद केल्यामुळे त्यांचे नाव पुन्हा यादीत सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 

Web Title: In the state, 'Khadse Pe charcha', BJP star campaigner eknath khadse has no ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.