Join us

राज्यात ‘मटका’ दुपटीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:06 AM

१८ टक्के जीएसटीमुळे आॅनलाइन लॉटरी व्यवसाय जवळ-जवळ संपुष्टात आल्याने लॉटरीग्राहक मटका बाजाराकडे वळले आहेत.

राजेश निस्ताने  मुंबई : १८ टक्के जीएसटीमुळे आॅनलाइन लॉटरी व्यवसाय जवळ-जवळ संपुष्टात आल्याने लॉटरीग्राहक मटका बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे राज्यभर मटका-जुगाराचे अड्डे पोलिसांच्या मूक संमतीने सुरू झाले आहेत.पूर्वी मटका-जुगाराएवढाच ग्राहक आॅनलाइन लॉटरीत होता, परंतु १८ टक्के जीएसटी लागल्याने कुणीही ग्राहक आता लॉटरी खेळण्यास उत्सुक नाहीत. त्याऐवजी आकडा लागल्यास पूर्ण पैसे देणाऱ्या मटका व्यवसायातील गर्दी वाढली आहे. अचानक ग्राहक वाढल्याने ग्रामीण महाराष्टÑात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका-जुगाराचे नवे अड्डे उघडू लागले आहे. त्यापासून पोलिसांना मिळणाºया ‘लाभा’चे प्रमाणही तेवढ्याच पटीने वाढले आहे. मटका व्यवसायातील ही भरभराट पोलिसांना दिलासा देणारी असली, तरी राज्यातील सामान्य नागरिक मटका अड्ड्यावर लुटला जात आहे. मजूर-कामगारांचा पैसा घरी जाण्याऐवजी मटका अड्ड्यावरच त्याचे खिसे रिकामे केले जात आहे.एके काळी संपूर्ण राज्याचे नियंत्रण करणाºया मुंबईतील कल्याण, मेनबाजार, मिलन बाजार, राजधानी या प्रमुख मटका किंगने शेजारील राज्यात आश्रय घेतला आहे. आपसी वाद, गुन्हेगारीचा शिरकाव यामुळे मुंबईत मटका व्यवसायातील भागीदारी तुटली आहे. त्यांचे आकडे मात्र नियमित उघडत आहेत. शेजारी राज्यात मटका व्यवसाय चालवूनही या प्रमुख मटका किंगचे राज्यातील पोलीस खात्यातील वरिष्ठांशी ‘कनेक्शन’ कायम आहेत.नऊ राज्यांत मटकामहाराष्टÑ, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व पश्चिम बंगाल या नऊ राज्यांत मटका सर्वाधिक चालतो. उत्तर भारतात मटका चालविला जात नाही. नागपुरातील बागडी या मटका किंगचा ब्रँड अनेक राज्यांत चालतो. मटका व्यवसायातील दरदिवशीची ही उलाढाल १०० कोटींपेक्षा अधिक आहे.४० टक्के ‘मार्जीन’मटक्याच्या या व्यवसायात ४० टक्के मार्जीन राहते. ४० टक्के ग्राहकाला परतावा आणि २० टक्के ‘वाटप’ असे हे गणित आहे. ग्राहक खेळत राहावा, मटका व्यवसाय नियमित चालावा, म्हणून ग्राहकाला ४० टक्के परतावा देण्याकडे कल असतो.सट्टा डॉट कॉमवर आकडेपूर्वी ओपन-क्लोज आकडे वृत्तपत्रात प्रकाशित केले जात होते, परंतु आता सट्टा डॉट कॉम या वेबसाइटवर आकडा उघडताच लगेच तो फ्लॅश केला जातो.