राज्यात अंशतः लॉकडाऊन आवश्यक, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:26 PM2021-03-08T23:26:47+5:302021-03-08T23:29:03+5:30
राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढण्यास नागरिकांची बेपर्वाई कारणीभूत असून नागरिकांनी सतत मास्क लावणे आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले आहे. (Dr Deepak Sawant)
मुंबई- एकंदरीत राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबईसह राज्यात अंशतः लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr Deepak Sawant) यांनी म्हटले आहे. तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. (The state needs a partial lockdown said former health minister Dr Deepak Sawant)
राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढण्यास नागरिकांची बेपर्वाई कारणीभूत असून नागरिकांनी सतत मास्क लावणे आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले आहे.
बीचेस, मॉल्स, जिम्स, रेल्वे प्लँटफॉर्म, बस स्थानकं, एसटी डेपो, भाजी मंडई, मार्केट येथील गर्दी कमी करणे गरजेचे आहे, तसेच काँटॅक्ट ट्रेसिंग वाढवणे गरजेचे असल्याचेही सावंत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.