राज्यातील परिचारिकांची अवस्था अजूनही ‘दीन’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 02:04 AM2019-05-12T02:04:02+5:302019-05-12T02:04:31+5:30

आरोग्यसेवा क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवर रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे.

 State nurse stays still poor | राज्यातील परिचारिकांची अवस्था अजूनही ‘दीन’!

राज्यातील परिचारिकांची अवस्था अजूनही ‘दीन’!

Next

- स्नेहा मोरे

मुंबई : आरोग्यसेवा क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवर रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे. कमी पगार, त्यात कामाचे जादा तास, रुग्ण वा त्याच्या नातेवाइकांकडून मिळणारी वागणूक, यामुळे परिचारिकांना सेवा बजावताना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात जवळपास दोन हजार पदे रिक्त आहेत. गेली अनेक वर्षे वारंवार मूलभूत मागण्यांसाठी झगडणाºया परिचारिकांची ही ‘दीन’ अवस्था आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आली आहे.
आरोग्य विभागात जवळपास १ हजार ६७ तर वैद्यकीय शिक्षण विभागात ९३० पदे रिक्त असल्याची माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने दिली आहे. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलने शहरामध्ये तीन रुग्णांमागे एक परिचारिका आणि ग्रामीण भागात चार रुग्णांसाठी एक असे प्रमाण निश्चित केले आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. काही ठिकाणी तर एका परिचारिकेला एकावेळी २५ ते ३० रुग्णांची सेवा करावी लागते. प्रत्येक तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे प्रमाण महाराष्ट्र परिचर्या परिषदेनेही मान्य केले आहे, पण प्रत्यक्षात रुग्णालयांमधील खाटा आणि जमिनीवर ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, हे प्रमाण काही ठिकाणी ४० रुग्ण आणि एक परिचारिका यापेक्षाही जास्त होते, असे धक्कादायक वास्तव असल्याची माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने दिली आहे.

परिचारिका अधीक्षिकांंचे पदच ‘गायब’
आजाराने खचलेल्या रुग्णांसाठी उपचाराइतकेच सुश्रूषेला महत्त्व असते. त्यामुळेच परिचारिकांना रुग्णसेवेच्या पाठीचा कणा म्हटले जाते. ही सेवा करण्यासाठी परिचारिकांना वेळोवेळी सूचना करणे, स्वत:हून त्यासाठी पुढाकार घेणे, असे परिचारिका अधीक्षिकांंचे कर्तव्य असते. गेल्या आठ वर्षांपासून परिचारिका अधीक्षिकांचे पद रद्द केले आहे. त्यामुळे परिचारिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही, अशी स्थिती उद्भवली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग
रिक्तपदांची आकडेवारी
पदे रिक्त पदे
परिसेविका ४००
स्टाफ नर्स १५०
आरोग्य परिचारिका १००
अधिसेविका वर्ग २४
शिक्षिका १२१
मनोरुग्ण परिचारिका १००
सहायक अधिसेविका ९२

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्तपदांची आकडेवारी
पदे रिक्त पदे
अधिसेविका ४००
स्टाफ नर्सेस ५३०

Web Title:  State nurse stays still poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई