Join us  

'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 3:27 PM

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Jayant Patil ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसातच होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षानेही राज्यात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत अजित पवार यांनी पेहराव बदलल्याचे दिसत आहे. यावरुन आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला. 

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि महायुती सरकारबाबत भाष्य केले. यावेळी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बदललेल्या पेहरावारही भाष्य केले. 

Ajit Pawar ‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली

"मी आणि अजित पवार अनेक वर्षे एकत्र होतो, याआधी त्यांना आम्ही अचूक सूचना करायचो. आम्ही सांगूनही कधी अजित पवार बदलले नाहीत. त्यांनी आपला स्वभाव बदलला नाही. पण एका कंपनीला आता त्यांनी प्रचंड पैसे दिले आहेत, त्यांच्या जनसंपर्काची काम ती कंपनी करत आहे. त्या कंपनीने सांगितल्याप्रमाणे अजित पवार बदलले आहेत. ते सांगतात तसे ते कपडे घालत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. 

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली. पाटील म्हणाले, सरकारने आत्मविश्वास गमावला आहे. ३०० कोटी रुपये जाहिरातीसाठी, तसेच ३०० कोटी रुपये योजना दूतांना दिले आहेत. त्यांना सहा महिन्यांचे कंत्राट दिले आहे. त्यांना प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये दिले जाणार आहेत, असंही पाटील म्हणाले.  

"लाडकी बहीणसारखी योजना अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करु शकते. एका घरात तीन ते चार महिला असतील तरीही त्यांना पैसे दिले आहेत. निवडणुकीनंतर हे रिव्हाइज करतील, यानंतर कमी महिलांना पैसे मिळतील, असं त्यांच्यातील एका आमदाराने सांगितले आहे. आमचं सरकार आलं तर ही योजना चांगली करु. बहि‍णींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी योजना करु असंही पाटील म्हणाले. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार