राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर, १८ सप्टेंबर रोजी सोलापुरात होणार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 07:32 PM2017-09-12T19:32:19+5:302017-09-12T19:32:19+5:30
राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले असून येत्या १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई दि. १२ – राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले असून येत्या १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी उच्च गुणवत्तेचे १८ प्राथमिक शिक्षक, ८ माध्यमिक शिक्षक, २ प्राथमिक शिक्षक (अपंग), १ माध्यमिक शिक्षक (अपंग) एकूण २९ शिक्षक निवडले जातात. राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राथमिक शिक्षक, एक माध्यमिक शिक्षक, प्रत्येक विभागातून एक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, राज्यातून एक कला शिक्षक, एक क्रीडा शिक्षक, एक स्काऊट शिक्षक, एक गाईड शिक्षिका यांना पुरस्कार दिले जातात. याचबरोबर, राज्यातून ०१ पुरस्कार अपंग प्रवर्गासाठी दिला जातो.
तसेच , प्रत्येक आदिवासी क्षेत्रानुसार पुरस्कारांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. मुंबई विभाग ०३ (ठाणे, रायगड, पालघर प्रत्येकी एक) पुणे विभाग ०२, (पुणे, अहमदनगर प्रत्येकी एक) नाशिक विभाग ०६, (नाशिक, नंदुरबार प्रत्येकी ०२, धुळे, जळगाव प्रत्येकी ०१), लातूर विभाग ०१, (नांदेड ०१), नागपूर विभाग ०५, (नागपूर, गोंदिया, चंद्रपूर प्रत्येकी ०१ व गडचिरोली ०२) अमरावती ०२, (अमरावती, यवतमाळ प्रत्येकी ०१) एकूण १९ पुरस्कार दिले जातात. कोल्हापूर विभाग ०, औरंगाबाद विभाग ०, (कोल्हापूर, औरंगाबाद विभागात आदिवासी क्षेत्र नसल्यामुळे) पुरस्कार दिले जात नाहीत. यानुसार सन २०१७-१८ चे राज्य शासनाचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यावेळेस राज्य स्तरावर दिला जाणारा अपंग शिक्षक पुरस्कार हा पुणे जिल्ह्याला मिळाला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर प्राथमिक शिक्षक २, माध्यमिक शिक्षक २, असे पुरस्कारही पुणे जिल्हयाला मिळाले. एकूण राज्यभरात १०७ शिक्षकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.