मराठी अभ्यास केंद्राकडून दिला जाणार राज्य शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:07 AM2021-09-05T04:07:03+5:302021-09-05T04:07:03+5:30

मुंबई : ‘आदिवासी सेवक’ या राज्य पुरस्काराने सन्मानित स्व. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी ...

State Teacher Award to be given by Marathi Studies Center | मराठी अभ्यास केंद्राकडून दिला जाणार राज्य शिक्षक पुरस्कार

मराठी अभ्यास केंद्राकडून दिला जाणार राज्य शिक्षक पुरस्कार

Next

मुंबई : ‘आदिवासी सेवक’ या राज्य पुरस्काराने सन्मानित स्व. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा संस्थाचालक संघ यांच्यावतीने राज्य शिक्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. शिक्षक दिनानिमित्ताने मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठी हा पुरस्कार असून, ७७७७ रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे त्याचे स्वरूप आहे. कै. अशोक नाना चुरी स्मृती राज्य शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत अध्यापनाचे काम करणारे शिक्षक/शिक्षिका आपला प्रस्ताव पाठवू शकतील.

कै. अशोक चुरी यांच्या पत्नी अनिता चुरी यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा राज्य शिक्षक पुरस्कार आम्हा कुटुंबासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून हा पुरस्कार त्यांच्या कामाला उजाळा देणारा तर ठरेलच परंतु शिक्षकांसाठीसुद्धा प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्कार देणे हे आमच्यासाठी गौरवास्पद असून, या पुरस्कारासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन शिक्षकांना करत असल्याची माहिती मराठी शाळा संस्थाचालक संघाचे व या पुरस्कार समितीचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी दिली.

Web Title: State Teacher Award to be given by Marathi Studies Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.