२८०० मेगावॉट क्षमतेच्या जल विद्युत प्रकल्पातून राज्याला वीज मिळणार

By सचिन लुंगसे | Published: November 28, 2023 05:55 PM2023-11-28T17:55:41+5:302023-11-28T17:56:36+5:30

हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे २०२७, २०२८ उजाडणार आहे.

state will get electricity from the 2800 MW hydropower plant | २८०० मेगावॉट क्षमतेच्या जल विद्युत प्रकल्पातून राज्याला वीज मिळणार

२८०० मेगावॉट क्षमतेच्या जल विद्युत प्रकल्पातून राज्याला वीज मिळणार

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोळशापासून तयार होणाऱ्या विजेमुळे प्रदूषणाचा प्रश्न जटिल झाला असून, ही वीज महागडी देखील असते. यावर उपाय म्हणून आणि वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळावी याकरीता काम केले जात असून, टाटा पॉवरच्या भिवपुरी येथील १ हजार आणि शिरोटा येथील १ हजार ८०० अशा २ हजार ८०० मेगावॉटच्या जल विद्युत प्रकल्पातून मुंबईसह महाराष्ट्राला वीज पुरवठा केला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे काम आता सुरू झाले असून, हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे २०२७, २०२८ उजाडणार आहे.

टाटा पॉवरच्या भिवपुरी येथील जल विद्युत प्रकल्पातून १ हजार मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. शिवाय येथून जवळ असलेल्या शिरोटा जल विद्युत प्रकल्पातून १८०० मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. दोन्ही प्रकल्पातून २८०० मेगावॉट वीज मिळणार आहे. मुंबई आणि राज्याला या विजेचा पुरवठा करता यावा म्हणून टाटा पॉवर आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानूसार राज्याला आवश्यक असलेली वीज मिळेल. तर उर्वरित राज्याला देखील या प्रकल्पातून ओपन ग्रीडद्वारे वीज पुरवठा केला जाईल.

दरम्यान, मुंबईला मिळणारी अधिकाधिक वीज ही कोळशावर तयार होणारी आहे. आता प्रदूषण कमी करण्यासाठी वीज कंपन्या पुढे येत असून, जल, पवन आणि सौर ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

भिवपुरी प्लांट - २०२७ साली सुरू होणार

शिरोटा प्लांट - २०२८ साली सुरू होणार

- मुंबईला टाटा पॉवरकडून रोज ९०० मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो.

- ९०० पैकी ५०० मेगावॉट वीज कोळशापासून तयार केली जाते. उर्वरीत वीज जल, पवन आणि सौर ऊर्जा प्रक्लपातून तयार केली जाते.

ट्रॉम्बेचे काय होणार

ट्रॉम्बे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाचा कालावधी पुढील वर्षी संपत आहे. मात्र प्रकल्प सुरू ठेवला जाणार आहे. येथील ५ नंबर युनिट सुरू ठेवण्या बाबत सकारात्मक भूमिका आहे. शिवाय सरकार देखील हा प्रकल्प सुरू ठेवा, असे म्हणत आहे. आता वीज नियामक आयोग आणि उर्वरीत घटकांबबात संवाद साधत निर्णय घेतला जाईल, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. टाटा पावरच्या दोन्ही जलविद्युत प्रकल्पातून कोणत्याही वीज कंपनीला खुल्या बाजारातून वीज विकत घेता येणार आहे.

Web Title: state will get electricity from the 2800 MW hydropower plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.