मुंबई : उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.९ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.८ ते १० फेब्रुवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ११ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहील. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान २८ व १७ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. या वाऱ्याचा प्रभाव कोकणावर विशेषत: उत्तर कोकणावर अधिक आहे. परिणामी मुंबईच्या आणि उत्तर कोकणातील कमाल तापमानात घट झाली आहे, असे हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.शहरांचे किमान तापमानअलिबाग १८, रत्नागिरी १७.९, पणजी २०, डहाणू १६.७, पुणे १०.५, अहमदनगर ९.९, जळगाव १५, कोल्हापूर १७.३, महाबळेश्वर १०.६, मालेगाव १४.२, नाशिक १३.२, सांगली १५.३, सातारा ११.८, सोलापूर २०.४, औरंगाबाद १५.६, परभणी १९, नांदेड १९, बीड १४.८, अकोला १८.५, अमरावती १९.४.काश्मीर, हिमाचल उत्तराखंडात बर्फवृष्टीजम्मू : श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद राहिल्याने आणि या भागात मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर विमान सेवा बंद राहिल्याने काश्मीरचा दुसºया दिवशीही उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातही प्रचंड बर्फवृष्टी सुरू असून, तेथील रस्ते वाहतूकही बंद पडली आहे.
राज्यात दोन दिवस राहील थंडीची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:54 AM