Join us

राज्याला लवकरच मिळणार ६० लाख लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात लसीकरण मोहिमेला वेग मिळण्यासाठी लसींच्या डोसचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात लसीकरण मोहिमेला वेग मिळण्यासाठी लसींच्या डोसचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी २० लाख डोस खरेदी करण्यासाठीही केंद्राकडून प्रस्ताव प्रतीक्षेत असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

नव्याने उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्यातून दुसरा डोस असणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे, त्याचप्रमाणे ४५ हून अधिक वयोगटातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पहिला डोसही देण्यात येईल.

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले, सक्रिय रुग्ण, पॉझिटिव्हीटी दर या मुद्द्यांवर समोर ठेवून लसींच्या डोसचे वितरण करण्यात येईल. लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाईल. ज्या जिल्ह्यांमध्ये पॅझिटिव्हीटीचे प्रमाण अधिक आहे, तिथे लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि ४५ हून अधिक वय असलेल्या पहिला डोसच्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

केंद्राकडून मिळणारा लसींचा साठा आणि राज्य खरेदी करत असलेला लसींचा साठा याचा समतोल राखून त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्ववत सुरू करण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

...........................................