लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील ६० टक्के जनता ही झोपडपट्टीत राहते. त्यांना हक्काचे घर नाही.
मुंबईतील गोरगरिबांना तसेच पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना आपले हक्काचे पक्के घर मिळावे आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याची उपाय योजना कार्यान्वित करण्यात यावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. याची अंमलबजावणी झाली नसल्याने खासदार गोपाळ शेट्टी यांनी राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देऊन मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तसेच पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना २०१७ जीआरप्रमाणे आपले हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून विनंती केली आहे.
राज्यपाल महोदयांनी संपूर्ण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून लवकरच या विषयावर योग्य निर्देश देण्याचे आश्वासनही दिले. तसेच प्रधान सचिव गृहनिर्माण, एसआरएचे सीईओ आणि महानगरपालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश देईन, असे त्यांनी सांगितले.