२५ लाख मुंबईकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:14 AM2018-06-17T01:14:12+5:302018-06-17T01:14:12+5:30

मुंबईमध्ये राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संगनमताने पाण्याचा दुष्काळ निर्माण केला जात असून, या दुष्काळामुळे मुंबईतल्या २५ लाख लोकांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

Statements for water supply of 25 lakhs | २५ लाख मुंबईकरांची पाण्यासाठी वणवण

२५ लाख मुंबईकरांची पाण्यासाठी वणवण

Next

- सागर नेवरेकर
मुंबई : मुंबईमध्ये राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संगनमताने पाण्याचा दुष्काळ निर्माण केला जात असून, या दुष्काळामुळे मुंबईतल्या २५ लाख लोकांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात कमालीची तफावत असून, मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ लढा दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने येथील जलवितरणासह जलसंकटाचा आढावा घेतला असून, येथील जल वितरणाच्या व्यवस्थेबाबत जलतज्ज्ञांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.
पाणी हक्क समितीचे सदस्य सीताराम शेलार यांनी याबाबत सांगितले की, मुंबई शहरात पाण्याची कमतरता नाही. महापालिका गगनचुंबी इमारतींच्या बांधकामांना परवानगी देतानाच त्यांना पुरेसे पाणी देते. मात्र दुसरीकडे २५ लाख गरिबांना पाण्यापासून वंचित ठेवले जाते. निती आयोगाने पाण्याचा अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार आपण पाण्याचे संवर्धन केले नाही तर पाण्याची मोठी समस्या उद्भवणार आहे. दरवर्षी देशामध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही म्हणून प्रत्येक वर्षी दोन लाख माणसे मरतात. सरकार अहवाल सादर करून अशा प्रकारची चिंता व्यक्त करता, प्रत्यक्ष कृती करावी.
>येथे आहे पाण्याची समस्या
मानखुर्द पश्चिमकडील मंडाला (इंदिरानगर, जनतानगर, मातंग रिशी नगर) परिसरात पाण्याची गंभीर समस्या आहे. रहिवासी टँकरसह इतर ठिकाणांहून सायकलमार्फत पाणी आणतात.
गोवंडी येथील बाबानगर आणि रफीकनगर येथेसुद्धा पाणी मिळत नाही. अ‍ॅण्टॉप हिल येथील आझाद मोहल्ला आणि गोवंडी येथील शिवाजीनगरमधील बैंगणवाडी येथेही पाण्याची समस्या आहे.
ट्रॉम्बे येथील चित्ता कॅम्पमधील पायलीपाडा येथे जुलै २०१७ पासून पाण्याची समस्या आहे.
दहिसर पूर्वेकडील गणपत पाटीलनगर येथे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेली वस्ती आहे. येथे लोक पाण्यापासून वंचित आहेत. येथील रहिवाशांना पाणी दिले जात नाही.
गोराई येथील कुलमेव गावठाणातील ५० हून अधिक घरांमध्ये पाण्याची कमतरता
आहे.
मालाड पश्चिमेकडील मालवणी येथील आझमीनगर परिसरात पाण्याचा दाब कमी आहे.
मालवणी येथील राठोडी हा गावठाण परिसर असून ५०० हून अधिक घरांना पाणी मिळत नाही.
मालाड पश्चिमेकडील मालवणी येथील अंबोजवाडीमधील रहिवासी कित्येक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.
दहिसरमधील वैशालीनगरमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे.
कांदिवली, मालाड पूर्वेकडील रहिवाशांना पाण्याची जोडणीच दिली जात नाही.
वडाळा ट्रान्झिट कॅम्प या ठिकाणीसुद्धा पाणी मिळत नाही.

Web Title: Statements for water supply of 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.