राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प १८ जूनला

By अतुल कुलकर्णी | Published: May 28, 2019 05:30 AM2019-05-28T05:30:39+5:302019-05-28T05:30:57+5:30

१७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत भरत असून विधानसभा निवडणुकांच्या आधीचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे.

The state's additional budget will be on June 18 | राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प १८ जूनला

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प १८ जूनला

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी 
मुंबई : १७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत भरत असून विधानसभा निवडणुकांच्या आधीचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात १८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सत्ताधारी भाजप शिवसेना जोमात आली असून पराभूत विरोधक या अधिवेशनात कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेत विरोधकांची संख्या कमी होत असताना विधान परिषदेत देखील काँग्रेस, राष्टÑवादीचे संख्याबळ कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर
माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या
जागेवर भाजपने सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उभे केले आहे.
संख्याबळाच्या जोरावर भाजप ही जागा जिंकेल असे चित्र आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले काँग्रेसचे सुभाष झांबड यांची मुदत २९ आॅगस्ट रोजी संपत आहे. ती जागाही भाजपने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे भाजपचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढेल व डिसेंबरमध्ये नव्या सरकारच्या होणाऱ्या पहिल्याच अधिवेशात भाजप सभापतीपदावर दावा करेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र जर या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा मुद्दा शिवसेनेने लावून
धरला तर त्याचवेळी सभापतीपदाचे गणीतही जमवण्याचा प्रयत्न भाजप करत असली तरीही त्यात आकडेमोडीत त्यांना फारसे यश
येताना दिसत नाही.
१८ जून रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या भाषणावरील चर्चा बुधवारी या अधिवेशनात होईल. तर २० व २१ जून रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल.
२४ व २५ जून या दोन
दिवसांत अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होईल. तर
२६ जून रोजी विनियोजन विधेयक मांडले जाईल. पुरवणी मागण्यांवर चर्चा २७ जून रोजी होईल व
पुरवणी विनियोजन विधेयक २८ जून रोजी सादर होईल. तिसºया आठवड्यात फक्त शासकीय कामकाज दाखवण्यात आले आहे.
>घोषणा, योजनांची जंत्री
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यामुळे भरपूर घोषणा, योजनांची जंत्री असे त्याचे स्वरूप असेल. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणा व योजनाही अर्थसंकल्पात असतील, असे वित्त विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. विरोधक या अधिवेशनात किती आक्रमक होतात, कोणते विषय मांडतात व मुळात विरोधक किती एकदिलाने सभागृहात दिसतील यावर सध्या चर्चा रंगत आहेत.

Web Title: The state's additional budget will be on June 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.