राज्याचे हवाई धोरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:11 AM2017-12-29T05:11:23+5:302017-12-29T05:11:27+5:30

मुंबई : राज्याचे हवाईधोरण लवकरात लवकर तयार करावे, शिर्डीच्या विमानतळावर नाइट लँडिंगची व्यवस्था नजीकच्या काळात उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

State's air policy soon | राज्याचे हवाई धोरण लवकरच

राज्याचे हवाई धोरण लवकरच

Next

मुंबई : राज्याचे हवाईधोरण लवकरात लवकर तयार करावे, शिर्डीच्या विमानतळावर नाइट लँडिंगची व्यवस्था नजीकच्या काळात उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) आढावा
बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नागपुरातील मिहान प्रकल्पाला कमी दराने वीज मिळविण्यासाठी जवळचे बंद पडलेले ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा पर्याय तपासून त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मिहानमधील अभिजित एमएडीसी नागपूर एनर्जी प्रा. लि. हा प्रकल्प सध्या बंद आहे.
मिहान अंतर्गत पुनर्वसित होणा-या कुटुंबांसाठी गृह प्रकल्पांचे विकास शुल्क, पुढील वर्षी इंडिया एरोबिझ एअर शो आणि विमानचालन शिखर परिषद-२०१८ चे मिहानमध्ये आयोजन, मिहानमध्ये एमएडीसीमार्फत बांधण्यात येणारे व्यावसायिक संकुल, प्रादेशिक दळणवळण योजनेच्या (आरसीएस) अंमलबजावणीसाठी आरसीएस सेल स्थापन करणे, आरसीएस अंतर्गत तसेच अन्य विमानतळांच्या कामांचा आढावा, पुरंदर (जि. पुणे) विमानतळाच्या कामाबाबतची प्रगती आदींबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
>आराखडा तयार करा
शिर्डी विमानतळावर दोन महिन्यांत विमानांच्या नाईट लँडिंगची सुविधा होईल, असे अधिकाºयांनी बैठकीत स्पष्ट केले. शिर्डीतील नवीन टर्मिनस इमारत आकर्षक व्हावी यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करावा. भाविकांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने येथे पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव करावा. अकोला विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी सध्याच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: State's air policy soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.