राज्याचा झाला ‘महाराष्ट’

By admin | Published: April 3, 2015 10:36 PM2015-04-03T22:36:08+5:302015-04-03T22:36:08+5:30

महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग वाहनचालकांकरिता दिशादर्शक फलक, सूचना फलक यासोबतच घोषवाक्याचाही वापर करीत आहे.

State's 'Maharashtra' | राज्याचा झाला ‘महाराष्ट’

राज्याचा झाला ‘महाराष्ट’

Next

अमोल पाटील, खालापूर
महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग वाहनचालकांकरिता दिशादर्शक फलक, सूचना फलक यासोबतच घोषवाक्याचाही वापर करीत आहे. मात्र हे करताना राज्याचाच कळत-नकळत अवमान केला जात आहे.
खोपोली-पाली राज्यमार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकावर महाराष्ट्राचे नामकरण चक्क ‘महाराष्ट’ असे करण्यात आल्याने प्रवाशांत नाराजी आहे.
खोपोली - पाली या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये - जा करतात. महाड व रोहा एमआयडीसीमध्ये जाणारे मालवाहू ट्रक तसेच गोवा आणि कोकणात जाणारे पर्यटकही याच रस्त्याचा वापर करतात. या मार्गावर अनेक वळणे आहेत. तसेच शाळा, गावे, गतिरोधक यांची माहिती वाहनचालकांना व्हावी याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर दिशादर्शक फलक उभारले आहेत. या फलकांच्या मागच्या बाजूला काही घोषवाक्येही लिहिण्यात आली आहेत. देवन्हावे येथेही असाच फलक आहे. या फलकावर राष्ट्राच्या सेवेत ‘महाराष्ट पीडब्लूडी’ असे लिहिण्यात आले आहे. राज्याचा उल्लेखच असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Web Title: State's 'Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.