राज्याच्या किमान तापमानात वाढ
By admin | Published: November 13, 2014 01:08 AM2014-11-13T01:08:45+5:302014-11-13T01:08:45+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली
Next
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली असून, पुढील 24 तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
नोव्हेंबर महिना उजाडून 1क् दिवस उलटले तरी ऑक्टोबर हीटचा मुंबईतला तडाखा अद्याप कमी झालेला नाही. मुंबईचे कमाल तापमान अद्याप 35 अंशाच्या घरात नोंदविण्यात येत असून, किमान तापमानही 25 अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. मध्यंतरी आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईच्या किमान तापमानात 5 अंशाची घसरण झाली होती आणि शहराचे किमान तापमान 2क् अंशावर येऊन ठेपले होते. मात्र किमान तापमानही आता वाढले असून, मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभविण्यासाठी अजून 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, असा
अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)