Join us

निवडणूक प्रक्रियेविरोधात ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 5:56 AM

देशातील सर्व निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्याची मागणी करत, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीने बुधवारी, ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई : देशातील सर्व निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्याची मागणी करत, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीने बुधवारी, ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.आंदोलनाचे नेतृत्व करणारे पार्टीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी सांगितले की, ईव्हीएमद्वारे निवडणूक धोरण राबविताना व्ही. व्ही. पैट पेपर ट्रेल व्यवस्था असणे आवश्यक आहे. यंत्रणा सक्षम होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांद्वारेचमतदान घ्यावे. या मागणीसाठी वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय भवनावर बुधवारीनिदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.