Join us

पालिका मुख्यालयातील स्थिती: अद्ययावत यंत्रणा; पण सतर्कतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:56 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांचे लक्ष्य मुंबई महापालिकेचे मुख्यालयही ठरले असते. प्रवेशद्वार क्रमांक २ वरील सुरक्षारक्षक या गोळीबारात जखमी झाला.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांचे लक्ष्य मुंबई महापालिकेचे मुख्यालयही ठरले असते. प्रवेशद्वार क्रमांक २ वरील सुरक्षारक्षक या गोळीबारात जखमी झाला. दगडी इमारत, लोखंडी द्वारामुळे थोडक्यात निभावले. या घटनेतून धडा घेऊन पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत मोठे बदल झाले. आपत्कालीन नियंत्रण कक्ष अधिक सक्षम आणि अद्ययावत झाले. पण मनुष्यबळाची ताकद आणि सतर्कता यात आजही सुरक्षा यंत्रणा कमी पडत आहे.महापालिका मुख्यालयाबाहेर प्रवेशद्वारांवर असलेल्या सीसीटीव्हीने अतिरेकी कसाबचे छायाचित्र टिपले होते. प्रवेशद्वारांवरील हे सीसीटीव्ही अनेक घटनांचे साक्षीदार ठरले आहेत. याचा फायदा महापालिकेला वेळोवेळी होत आहे. संशयास्पद हालचाली वेळीच टिपण्यासाठी या सीसीटीव्हींची नजर फायदेशीर ठरू शकते. मात्र सीसीटीव्ही टिपत असलेल्या घडामोडींवर नियंत्रण कक्षात २४ तास लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळ नाही. सुरक्षा खात्यात ४० टक्के पदे रिक्त असणे हेदेखील यामागचे कारण आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.मुंबई महापालिका मुख्यालयातील दोन इमारतींमध्ये पालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, चार अतिरिक्त आयुक्त, विविध वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष, कर्मचारी आणि शेकडो नागरिकांची विविध कामांसाठी वर्दळ असते. यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर दोन किंवा अधिक सुरक्षारक्षकांचा तीन पाळ्यांमध्ये पहारा असतो. मेटल डिटेक्टर, बॅग तपासण्याची मशीन अशी यंत्रणा आहे.मात्र अनेकवेळा मशीनमध्ये बॅग टाकल्यानंतरही त्यात एखादी आक्षेपार्ह वस्तू असल्यास त्यासाठी हटकले जात नाही, असे दिसून येते. तर बºयाचवेळा बॅग तपासायला सांगितल्यावरलोक हुज्जत घालतात. याचात्रास सुरक्षारक्षकांना सहन करावा लागतो.सुरक्षा यंत्रणेचे खाजगीकरणमहापालिकेने सुरक्षा यंत्रणेचेही खाजगीकरण केले आहे. त्यानुसार खाजगी कंपन्यांच्या सेवेबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाची मदत घेण्यात येते. लवकरच सुरक्षारक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.२६ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यावेळी मदतकार्यात समन्वयाची भूमिका निभावणाºया आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे बळ वाढविण्यात आले आहे. दुसºया मजल्यावरील या कक्षामध्ये अद्ययावत यंत्रणा असून कोणत्याही दुर्घटना व आपत्ती काळात मदतकार्य पोहोचविण्याचे व समन्वयाचे काम हे कक्ष चोख बजावित आहेत.इमारतीत शिरण्यासाठी अनेक मार्गअतिरेकी हल्ल्यानंतर करण्यात आलेला मोठा बदल म्हणजे प्रवेशद्वाराबाहेरील चौक्या, बंकर. मात्र मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ५ येथून छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकासाठी मागच्या दिशेने जाण्यासाठी असलेल्या आतील रस्त्यांवरून वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता हा मार्ग बाहेरच्या वाहनांसाठी खुला झाला आहे, जे धोकादायक ठरू शकते. या इमारतीमध्ये प्रवेशद्वारांवर सुरक्षा यंत्रणा असली तरी इमारतीमध्ये शिरण्यासाठी असलेले अनेक मार्गही असुरक्षितता वाढवित आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका