पालिका शाळांचा दर्जा घसरला, पालिकेच्या महासभेत तीव्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:51 AM2017-09-27T04:51:13+5:302017-09-27T04:51:22+5:30

प्रत्येक विद्यार्थ्यामागे वार्षिक ५० ते ५५ हजार रुपये महापालिका खर्च करीत आहे. मात्र या विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पालिकेनेच खेळ केला आहे.

The status of municipal schools has declined, severe publicity in the Municipal General Assembly | पालिका शाळांचा दर्जा घसरला, पालिकेच्या महासभेत तीव्र प्रतिसाद

पालिका शाळांचा दर्जा घसरला, पालिकेच्या महासभेत तीव्र प्रतिसाद

Next

मुंबई : प्रत्येक विद्यार्थ्यामागे वार्षिक ५० ते ५५ हजार रुपये महापालिका खर्च करीत आहे. मात्र या विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पालिकेनेच खेळ केला आहे. निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तू, बेचव खिचडी, बंद पडलेले सुगंधित दूध अशा योजनांचा बोजवारा उडाला आहे. याचे तीव्र पडसाद पालिकेच्या महासभेत आज उमटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. पुस्तकं जीर्ण, दप्तरं फाटलेली, सुगंधित दूध बंद झालेले, शिक्षकांची कमतरता अशी अवस्था पालिका शाळांची आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण
मिळत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरत पालिका प्रशासनावर तोफ डागली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पालिकेचा खेळ सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या बरोबरीचा आहे. अनेक योजना आणल्या, मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे,
असा संताप सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केला.
प्रशासनाला फाटलेल्या
दप्तरांचा नजराणा
जून महिन्यात दिलेल्या दप्तरांच्या सप्टेंबर महिन्यात चिंध्या झाल्या आहेत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळालेली नाही. तुटलेली दप्तर, कंपास बॉक्स
आणि डब्यांचे नमुने डॉ. सईदा
खान यांनी सभागृहात सादर केले. काही शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळालेली नाहीत. त्यांनी कसा अभ्यास
करावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

चर्चेतील मुद्दे
इंग्रजी माध्यमांना शिकवण्यासाठी गुजराती माध्यमांच्या शिक्षिका आहेत.
शिक्षक विभागात दहा उप परिमंडळ अधिकारी असणे अपेक्षित असताना केवळ दोनच अधिकारी आहेत.
विद्यार्थ्यांसाठी संगणक दिले, पण ते ठेवण्यासाठी जागा नाही. गेली १२ वर्षे खिचडीचा पुरवठा एकच ठेकेदार करीत आहे.

तुमच्या मुलांनाही पालिकेच्या शाळेत पाठवा
बरेच नगरसेवक पालिका शाळांमध्ये शिकले आहेत, ही बाब कौतुकाची आहेच, पण त्यांनी आपल्या मुलांनाही पालिका शाळांमध्ये पाठवावे, असा मार्मिक टोला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शाळांच्या दर्जावर पोटतिडकीने बोलणाºया नगरसेवकांना लगावला.

Web Title: The status of municipal schools has declined, severe publicity in the Municipal General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा