Join us

‘वैधानिक समिती’ शिवसेनेकडे; विरोधक, पहारेकऱ्यांची माघार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 7:06 AM

मनसेतून सहा नगरसेवकांचे बळ मिळाल्यानंतर मजबूत झालेल्या शिवसेनेला वैधानिक समित्यांचे अध्यक्षपदही बिनविरोध मिळविता येणार आहे़ शिवसेनेचे तुल्यबळ अधिक असल्याने विरोधकांनी वैधानिक समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जच भरले नाहीत.

मुंबई  - मनसेतून सहा नगरसेवकांचे बळ मिळाल्यानंतर मजबूत झालेल्या शिवसेनेला वैधानिक समित्यांचे अध्यक्षपदही बिनविरोध मिळविता येणार आहे़ शिवसेनेचे तुल्यबळ अधिक असल्याने विरोधकांनी वैधानिक समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जच भरले नाहीत़ त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची बिनविरोध निवड होणार आहे़२०१७ मध्येच भाजपाने महापालिकेतील वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यामुळे या वर्षी भाजपाने कोणत्याही पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही़ तसेच विरोधकांची ताकद आधीच कमी असल्याने उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे़ स्थायी, शिक्षण आणि सुधार या तीन वैधानिक समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल झालेला नाही़नाराजांनाही अध्यक्षपदाचे बक्षीसस्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेत बरेच दावेदार आहेत़ यात शिवसेनेचे मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचा पहिला हक्क असल्याचे मानले जाते़ मात्र यशवंत जाधव यांची वर्णी लावता यावी, यासाठी त्यांच्या मार्गातील हे दोन अडथळे यापूर्वीच दूर करण्यात आले होते़ मंगेश सातमकर यांना शिक्षण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तर आशिष चेंबूरकर यांचीही बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे़ मात्र सातमकर यांनी यापूर्वी दोन वेळा तर चेंबूरकर यांनी तीन वेळा त्या त्या समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे़कोरेगावकरांचा पत्ता साफआक्रमकतेत कमी पडलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश कोरगावकर एकाच वर्षाच्या अनुभवानंतर वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाद ठरले आहेत़ पालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या या समितीचे अध्यक्षपद आता यशवंत जाधव यांच्याकडे जाणार आहे़ मातोश्रीच्या मर्जीतील जाधव यांनी आपले वजन वापरून हे पद मिळविल्याचे बोलले जात आहे़

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेना