Join us

Coronavirus: मुंबईकरांनो शांत आणि संयमी रहा; मुंबई पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 3:36 PM

घरी राहण्याच्या आवाहनासोबतच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहिर करताच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी रांगा लावण्यास सुरुवात केली. अशावेळी मुंबईतही तेच चित्र असल्याने मुंबई पोलिसांकड़ून त्यांना शांत आणि संयमी राहण्यासाठी ट्वीटद्वारे  विनंती करण्यात येत आहे. तसेच 'सण सकारात्मकतेचा, संकल्प सुरक्षिततेचा म्हणत मुंबईकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.

खरेदीसाठी होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरु शकते. म्हणून मुंबई पोलिसांकड़ून नागरिकांना वेळोवेळी घरात राहण्याबाबतचे आवाहन करण्यात येत आहे. तरी देखील नागरिक बाहेर पड़त आहेत. नागरिकांपर्यन्त पोहचन्यासाठी त्यांनी सोशल मिडियावरुन जनजागृती सुरु केली आहे.

"सुज्ञ मुंबईकरांना विनंती करत, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा, दुकाने खुली असतील. सर्वप्रकारच्या वस्तू आपल्या जवळच्या दुकानामध्ये नेहमीप्रमाणे उपलब्ध होतील. कृपया शांत आणि संयमी रहा. आपणास कोणतीही ग़ैरसोय होत असल्यास १०० नंबर वर संपर्क साधा' असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्वीटद्वारे केले आहे.

शिवाय, फळ, भाजीपाला आणि औषधे अशा अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाहनांच्या दर्शनी भागावर तसे फलक लावणयाबाबतही सांगण्यात आले आहे. 

 तसेच 'आपण प्रत्येक संकटाचा सामना मिळून करण्याचा संकल्प करूया- आम्ही बाहेर व्यवस्था सांभाळतो तुम्ही घरीच सण साजरा करत म्हणत पोलिसांनी मुंबईकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. 

पोलिसांची कोरोना ट्रफिक हेल्पलाईनसंचारबंदीच्या पाश्वभूमीवर अत्यावश्यक तसेच इतर महत्त्वाच्या सेवा वगळून अन्य वाहनांच्या हालचालींवर बंदी आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका व जीवनावश्यक वस्तूच्या सेवेंमधील वाहनांच्या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये कुठलाही अडथळा येवू नये म्हणून मुंबई पोलिसांकड़ून कोरोना ट्रफिक हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. यात वाहनांना काही अडचणी असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांच्या २४९३७७४७, २४९३७७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात आले आहेत.   

सुरक्षित रहा, निरोगी रहा - पोलीस आयुक्तांकडून शुभेच्छा सुख दुःखात, विविध प्रसंगात एकमेकांस सहाय्य करणे ही मुंबईकरांची रीत आहे. ती रीत कायम ठेवणे हेच  हा उत्सव साजरा करण्याचे वैशिष्ट्य ठरेल,  सुरक्षित रहा, निरोगी रहा म्हणत पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस