जलमित्र व्हा, पाणी वाचवा

By Admin | Published: May 31, 2016 03:18 AM2016-05-31T03:18:23+5:302016-05-31T03:18:23+5:30

लोकमत’ वृत्तसमूहातर्फे राबविण्यात येणाऱ्या जलमित्र अभियानांतर्गत नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे दिले जात आहेत. सोमवारी ऐरोलीत झालेल्या अभियानामध्ये बोलताना प्रत्येक नागरिकाने

Stay hydrated, save water | जलमित्र व्हा, पाणी वाचवा

जलमित्र व्हा, पाणी वाचवा

googlenewsNext

नवी मुंबई : ‘लोकमत’ वृत्तसमूहातर्फे राबविण्यात येणाऱ्या जलमित्र अभियानांतर्गत नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे दिले जात आहेत. सोमवारी ऐरोलीत झालेल्या अभियानामध्ये बोलताना प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, पाण्याचे नियोजन, पुनर्वापर आवश्यक असल्याचे सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले.
ऐरोलीतील वैभव सीप एन डाईन हॉटेल येथे सोमवारी जलमित्र अभियानांतर्गत जलबचतीचा संदेश देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे अशा प्रकारचा जनजागृती उपक्रम राबविला जात आहे. प्यायला लागणार असेल तेवढंच पाणी मागवा...असा मोलाचा संदेश या माध्यमातून शहरातील विविध हॉटेल्समध्ये दिला जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. शहरातील हॉटेल चालकांना जलबचतीसाठी ठोस उपाययोजना राबविण्याकरिता ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. शहरात सर्वात जास्त पाण्याचा वापर हा हॉटेलमध्ये होत असून सध्या असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या उपक्रमातून विविध सूचना केल्या जात आहेत. जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पाण्याचा योग्य वापर करा करावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहे. शहरात ठिकठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये वैभव सीप एन डाईन हॉटेलचे मालक जयप्रकाश शेट्टी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून जलमित्र अभियानाला पाठिंबा दर्शविला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अंकुश सोनावणे, नवी मुंबई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टी, वैभव सीप एन डाईन हॉटेलचे श्यामलाल चौधरी, प्रशांत शेट्टी, चंद्रशेखर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Stay hydrated, save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.