जूनपर्यंत कोंडीतच रहा...! सांताक्रूझ-चेंबूर उन्नत मार्ग पुढील वर्षी; खर्च २३ कोटींनी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:44 PM2023-11-02T13:44:47+5:302023-11-02T13:44:58+5:30
पूल संरचनेत बदल करण्यात आल्याने वाढला प्रकल्पाचा खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या ठिकाणी उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दोन भागांत हे काम केले जाणार असून, पहिल्या भागाचे सुमारे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, असे असले तरी काही तांत्रिक कारणांमुळे आरेखनात बदल करण्यात आल्याने प्रकल्पाचा खर्च २३.५८ कोटींनी वाढला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास जून २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये तो पूर्ण होणार होता.
पहिल्या भागातील बांधकाम
- वाकोला जंक्शन आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन, बीकेसी जंक्शन मिळून कुर्ला ते वाकोला पुलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधला जात आहे.
- ४८०.६३ - कोटी रुपये खर्च
दुसऱ्या भागातील बांधकाम
- भारत डायमंड कंपनी, बीकेसी संकुल, वाकोला जंक्शन असा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.
- २६३.०९ - कोटी रुपये खर्च
खर्च का वाढला?
या उन्नत मार्गादरम्यान मेट्रो ३ मार्गिकेचा बोगदा येत असल्याने तसेच येथील मुख्य मार्गात पिलरचा अडसर येत असल्याने उन्नत मार्गाच्या केबल स्टेड पूल संरचनेत बदल करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च २३.५८ कोटींनी वाढला आहे.