असाल तेथेच थांबून राहा; आपल्या निवास व भोजनाची हमी आमची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 12:07 PM2020-04-12T12:07:42+5:302020-04-12T12:08:15+5:30

कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे  परतण्याचा प्रयत्न करू नये.

Stay tuned wherever you are, we guarantee your lodging and dining | असाल तेथेच थांबून राहा; आपल्या निवास व भोजनाची हमी आमची

असाल तेथेच थांबून राहा; आपल्या निवास व भोजनाची हमी आमची

Next

मुंबई  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊन चा कार्यकाळ वाढवावा लागलाआहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे  परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच राहावे. आपल्या सर्वांची राहण्याची सोय आणि पुरेसे अन्न देण्याची हमी शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. या कठीण प्रसंगी आपण सहकार्य करावे असे  आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

या कठीण काळात सरकारी यंत्रणा पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा तुमच्यासोबत आहे. याची खात्री बाळगा. सरकार आपल्या अन्न, निवारा याची आणि आरोग्य याची पुरेशी व्यवस्था करत आहे. केवळ आपले राज्य, आपला देश नव्हे तर संपुर्ण जगावर हे कोणाचे संकट आलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण गावी परतण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित वाटेतच आपणास अडविले जाईल. गावात घेतले न गेल्यास आपणावर अधिक कठीण प्रसंग ओढवेल, दुर्दैवाने साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढेल, म्हणून आपण आहात तिथेच राहा. असे  असे आवाहनही  देशमुख यांनी केले आहे. 

Web Title: Stay tuned wherever you are, we guarantee your lodging and dining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.