"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 07:17 PM2021-01-29T19:17:31+5:302021-01-29T19:21:59+5:30

Dr. Ajit Nawale : या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले असल्याचे माजी आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले.

"Stay well or I'll shot you"; Protest against the threat given to Dr. Ajit Navale | "नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध

"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन"; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देदेशभर सध्या भाजपाच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कमिटी सदस्य आणि महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि  शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांना "नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन" या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली आणि इतर दोन जणांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले असल्याचे माजी आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले.

देशभर सध्या भाजपाच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे. उद्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे. त्यांचा खून करणाऱ्या शक्तीच आज अशा धमक्या देत सुटल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कॉ. डॉ. अजित नवले यांना देण्यात आलेल्या या धमकीचा जळजळीत निषेध करत आहे. महाराष्ट्रातील सर्व देशप्रेमी आणि लोकशाही जनतेला या घटनेचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन करत आहे. फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या आणि त्या लाईक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे, असे पुढे आडम यांनी म्हटले आहे. 

Web Title: "Stay well or I'll shot you"; Protest against the threat given to Dr. Ajit Navale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.