अंधेरीत कौटुंबिक वादातून सावत्र भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:35 PM2018-10-26T23:35:53+5:302018-10-26T23:35:55+5:30

कौटुंबिक वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी अंधेरीत घडली.

Step brother murder in the dark | अंधेरीत कौटुंबिक वादातून सावत्र भावाची हत्या

अंधेरीत कौटुंबिक वादातून सावत्र भावाची हत्या

Next

मुंबई : कौटुंबिक वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी अंधेरीत घडली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी त्याच्या भावाला खारमधून अटक केली आहे. हे दोघे नेपाळचे राहणारे आहेत.
अंधेरी पश्चिमेच्या जुहू आदर्श इमारतीजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचा फोन गुरुवारी पोलीस नियंत्रण कक्षावर आला. त्यानुसार डी.एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव प्रेमकुमार भीमसिंग असून चौकशी दरम्यान त्याचा सावत्र भाऊ करणसिंग भीमसिंग यानेच ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. करणसिंग हा खारमध्ये एका खाऊच्या गाडीवर काम करतो. त्यानुसार त्याच्या वर्णनाचा एक इसम खार परिसरात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा त्यांनी पाली नाका या ठिकाणी सापळा रचून करणसिंगला बेड्या ठोकल्या.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनदार उभे करणारी टोळी जेरबंद
बनावट कागदपत्रे तयार करुन ती आरोपींच्या जामिनासाठी वापरणाऱ्या एका टोळीच्या ८ जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. रिक्षाचालक शाकीर खान (३५), शफीक कुरेशी (३४), फैय्याज खान (३४), इम्रान सलमानी (२७) यांच्यासह व्यावसायिक मुझफ्फर काझी (३८), इलेक्ट्रीशीयन युसूफ खान (३१), खाजगी नोकरदार रियाज पठाण (३५) आणि बिगारी कामगार परवेज शेख (५०) या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: Step brother murder in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.