Join us

नाट्यगृहे सुरू करण्यासाठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 2:29 AM

सांस्कृतिक सचिवांना दिले निवेदन

राज चिंचणकरमुंबई : मार्च महिन्यापासून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहे बंद आहेत आणि ती नक्की कधी सुरू होतील हे सध्या तरी अनिश्चित आहे. मात्र ही नाट्यगृहे लवकर सुरू करण्यात यावीत, अशा आशयाचे निवेदन आता जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने राज्याच्या सांस्कृतिक सचिवांना दिले आहे. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघातील सभासदांच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सध्या बंद असलेला नाट्यव्यवसाय सर्व गोष्टींची काळजी घेऊन कसा सुरू करता येईल, यावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार एक आराखडा बनविण्यात आला आणि सदर निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले नियम पाळत, काही मुद्द्यांचा विचार करून राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली असल्याचे नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. प्रत्येक नाट्यगृहामध्ये नाटकाचे रोज दोनच प्रयोग; प्रत्येक कलाकाराचे वेगळे मेकअप किट; शासकीय नियमांना गृहीत धरूनच नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. नाटकाच्या मध्यंतरात व नाटक संपल्यावर पोर्चमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी करण्यात येईल. नाटकाच्या प्रयोगाची तिकीटविक्री आॅनलाइन पद्धतीने करण्यात येईल; नाट्यप्रयोग सुरू होण्याअगोदर व प्रयोगानंतर प्रेक्षकांनी कलाकारांना भेटायला येऊ नये, अशी विनंती त्यांना करण्यात येईल; अशा मुद्द्यांचा या निवेदनात समावेश असल्याचे नाट्यधर्मी  आहे.त्यांना मदतच होईलच्एक आराखडा बनविण्यात आला आणि सदर निवेदन तयार करण्यात आले.च्राज्यातील नाट्यगृहे लवकर सुरू झाली तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल.

टॅग्स :मुंबई