अग्निशमनच्या नाराजीनंतर हटविल्या मंत्रालयासमोरील पायऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:01 AM2019-05-07T07:01:51+5:302019-05-07T07:02:10+5:30
मंत्रालय नूतनीकरणाच्या वेळी दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या पायºया या पोलीस आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विरोधामुळे तोडाव्या लागल्या ही बाब आता समोर आली आहे.
मुंबई : मंत्रालय नूतनीकरणाच्या वेळी दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या पायºया या पोलीस आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विरोधामुळे तोडाव्या लागल्या ही बाब आता समोर आली आहे.
मंत्रालयाच्या बाहेरून कोणी काही केले तर आतमधून कळत नसल्यामुळे पोलिसांनी या पायऱ्यांना विरोध केला व त्या तोडून टाकण्यासंदर्भात सूचना केली होती. अग्निशमन विभागानेही या पायºया काढण्याची सूचना केली होती. काही दुर्घटना घडलीच तर या पायºयांमुळे मदतकार्यात अडचणी येऊ
शकतात, याकडे विभागाने लक्ष वेधले होते.
फोर्ट व नरिमन पॉइंट परिसर हा वर्ल्ड हेरिटेजमध्ये मोडतो. मंत्रालयाची इमारत जुन्या शैलीप्रमाणे असल्यामुळे बांधलेल्या पायºया या चुकीच्या असल्याचे मत हेरिटेज समितीने मांडले होते.
या पायºयांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली होती. यामध्ये प्रधान सचिव भूषण गगराणी, माजी सनदी अधिकारी, माजी पोलीस महासंचालक तसेच वास्तुविशारद यांचा समावेश होता. या समितीने पायºयांचे बांधकाम चुकीचे असून त्या काढाव्यात, असा अहवाल दिला होता.
आर्किटेक्टनेसुद्धा इमारतीच्या शैलीला या पायºया योग्य नसल्यामुळे काढून टाकण्याची सूचना केली होती. या पायºया काढल्यामुळे मंत्रालयाच्या जुन्या सुंदर इमारतीचा दर्शनी भाग पुन्हा पाहावयास मिळत आहे. पायºया काढण्याचे काम शनिवारी रात्री सुरू करून रविवारी रात्रीपर्यंत संपविण्यात आले.