तोट्यातील फेऱ्यांमुळे मोनो रेल्वेचे 'आस्ते कदम'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:04 AM2018-08-31T06:04:31+5:302018-08-31T06:06:00+5:30

लक्ष पहिल्या टप्प्याच्या प्रतिसादावर : दुसºया टप्प्यासाठी रोजचा खर्च ४० लाख

Steps to the Mono Rail due to the losses in losses | तोट्यातील फेऱ्यांमुळे मोनो रेल्वेचे 'आस्ते कदम'

तोट्यातील फेऱ्यांमुळे मोनो रेल्वेचे 'आस्ते कदम'

Next

मुंबई : पहिल्या टप्प्याला मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे, दुसऱ्या टप्प्याला झालेल्या विलंबामुळे आणि नंतर आगीमुळे मोनो रेल्वेचा अडथळ्यांचा प्रवास रडतखडत सुरू आहे. वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा तयार असूनही सुरू केला जात नसल्यामागे खर्चाच्या वाढत्या ताणाचे कारण असल्याचे एमएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितले.

पांढरा हत्ती ठरलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची दहा महिने थांबलेली वाहतूक १ सप्टेंबरपासून आणि जेकब सर्कलपर्यंतचा अंतिम टप्पा पुढच्या वर्षी २ फेबु्रवारीला सुरू होणार आहे. पहिला टप्पा सुरू झाला, की हळूहळू पैसे मिळू लागतील. त्याचा फायदा पाहून पाच महिन्यांनी दुसरा टप्पा सुरू करण्याचे एमएमआरडीएने ठरविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लगेचच मोठ्या तोट्यात न जाता एमएमआरडीएने आस्ते कदम भूमिका घेतली आहे.

मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा हा वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतचा आहे. या भागात प्रतीक्षानगरच्या पट्ट्यात मोेठ्या प्रमाणावर वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे या टप्प्यात मोनोला चांगला फायदा होईल, असा एमएमआरडीएच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. महिन्याचा खर्च जाणार २० वरून ४० लाखांवर मोनोच्या पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन स्कोमी कंपनीकडे आहे. १० महिने सेवा बंद असूनही त्याच कंपनीने पुन्हा व्यवस्थापन स्वीकारले आहे. दुसºया टप्प्याच्या व्यवस्थापनासाठीही तयार असल्याचे त्यांनी एमएमआरडीएला कळविले आहे. या बदल्यात स्कोमी कंपनीने मोनोच्या प्रत्येक फेरीमागे प्राधिकरणाकडे १०,६०० रुपयांची मागणी केली आहे. या फेरीसाठी एमएमआरडीए स्कोमीला आधी ४,६०० रुपये देत असे. स्कोमीची वाढीव रकमेची मागणी एमएमआरडीएने मान्य केली आहे.

१० महिन्यांपूर्वी एमएमआरडीएला दिवसाचा खर्च आठ लाख रुपये येत असे. आता दुसºया टप्प्यात मोनोचे भाडे दुप्पट केल्याने आणि स्कोमीने रक्कमही वाढविल्याने एमएमआरडीएला दिवसाला २० लाखांचा खर्च येणार आहे. दुसरा टप्पा लगेच सुरू केल्यास हा खर्च ४० लाखांच्या घरात जाईल. ते एमएमआरडीएला सध्या परवडणारे नाही. त्यामुळे पहिला टप्पा सुरू करून त्यातील कमाई पाहून, पाच महिने थांबून दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.

चाचणी यशस्वी, दिवसभरात १३० फेºया
च्दहा महिन्यांपूर्वी आग लागल्याने बंद पडलेली मोनोरेल शनिवार, १ सप्टेंबरला सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा धावेल. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए प्रशासनाने गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून चेंबूर ते वडाळा या मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर यशस्वी ट्रायल चाचणी घेतली. च् चेंबूर आणि वडाळा या मोनोरेलच्या दोन्ही स्थानकांवरून सकाळी ६ वाजता पहिली मोनोरेल धावेल. सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान या मार्गावर दर १५ मिनिटांनी मोनो धावेल. दररोज तिच्या १३० फेºया होतील. चेंबूर स्थानकावरून मोनोरेलची शेवटची फेरी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी असेल तर वडाळा स्थानकातून मोनोरेलची शेवटची फेरी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी असेल. मात्र यापूर्वीचे १० रुपयांचे तिकीट आता २० रुपये असेल.

दहा स्थानकांचे काम पूर्ण
मोनोच्या दुसºया टप्प्यात म्हणजेच जेकब सर्कल ते वडाळादरम्यान १० स्टेशन्स आहेत. त्यांचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर तांत्रिकदृष्ट्या काही लहान कामे उरली आहेत. ती लगेच पूर्ण होतील. दुसरा टप्पा लवकर सुरू व्हावा, अशी प्रवाशांचीही मागणी आहे. मात्र खर्चाचा ताळेबंद जुळत नसल्याने एमएमआरडीएने तूर्त पहिल्या टप्प्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Steps to the Mono Rail due to the losses in losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.