मुंबई : श्वानांप्रमाणेच घराघरांमध्ये मांजरांनाही लाडाकोडाने पाळण्यात येते़ मात्र, या मनीमाऊंची संख्या वाढतच असल्याने त्यांचा उपद्रवही वाढला आहे़ याचा अनुभव पालिका अधिकाºयाने मुख्यालयात घेतला आहे़ त्यामुळे मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच त्यांचीही नसबंदी करण्यात येणार आहे़मुंबईकर गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या श्वानांमुळे त्रस्त आहे़ या त्रासात आता मांजरींच्या उपद्रवाची भर पडली आहे़ श्वानांप्रमाणे मांजरींपासून माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण कमी असले, तरी त्यांच्या केसांमुळे अनेक आजारांना आंमत्रणच मिळत आहे, तसेच मांजरांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी आणि आजारही फैलावत आहे. मात्र, भटक्या मांजरांचे वाढते प्रजनन रोखण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महासभेपुढे केली होती. मांजराची नसबंदी करून, त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचीही मागणी त्यांनी केली होती. या सूचनेवर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे़ पालिका प्रशासनाने तत्त्वत: मान्यता दिल्याने, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.नियमावलीनंतर निर्णयभटक्या मांजराच्या नसबंदीसाठी अॅनिमल वेल्फअर बोर्ड आॅफ इंडियाकडून मांजर प्रवर्गाला प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याबाबत नियमावली अस्तित्वात आल्यानंतर, मुंबईतील भटक्या मांजरांचे निर्बीजीकरण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.वर्षातून दोन ते तीन वेळा चारपेक्षा अधिक पिल्लांना जन्म देणाºया मांजरांमुळे हा उपद्रव वाढतोच आहे़ त्यामुळे भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी महासभेपुढे केली होती.आता मांजरांचीही गणना :महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत मुंबईतील पशुगणनेचे काम केले जाते़ मात्र, या पशुगणनेमध्ये भटक्या मांजराची गणना समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईत किती भटकी मांजरे आहेत? याबाबतची कोणतीच नोंद नाही़अॅनिमल वेल्फअर बोर्डने तयार केलेल्या नियमावलीनुसार, भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात येते. भटक्या मांजराची नसबंदी करण्याबाबत कुठलीही नियमावली नाही. त्यामुळे प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भटक्या मांजरांना समाविष्ट करण्याबाबत व मार्गदर्शक तत्त्वे कळविण्यासाठी अॅनिमल वेल्फेअर बोर्डशी पालिकेचा पत्रव्यवहार सुरू आहे़
मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मनीमाऊचीही नसबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 4:47 AM