Join us

धक्कादायक ! आरटीपीसीआरचे स्टिक पॅकिंग होतात झोपडपट्टीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 2:50 AM

उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : खेमानी झोपडपट्टी भागात चक्क आरटीपीसीआर टेस्टिंग स्वॅब स्टिक पॅकिंग करत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी पोलिसांसमवेत परिसराची पाहणी करून अन्न औषध व प्रशासन विभागाला कारवाई करण्याचे सांगितले आहे.  

उल्हासनगर कोणत्याही वस्तूची हुबेहूब वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शहराची यूएसए म्हणून देशात नव्हे तर जगात ओळख आहे. कॅम्प नं. ३ परिसरातील खेमानी ज्ञानेश्वरनगरमधील काही घरांत चक्क कोरोना महामारी काळात आरटीपीसीआर टेस्टिंग स्वॅब स्टिक कोणत्याही सुरक्षाविना पॅकिंग केल्या जात असल्याचे उघड झाले. अशा स्टिकच्या वापराने कोरोना चाचणी योग्य येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अतिरिक आयुक्त जुईकर यांनी या प्रकारची दखल घेऊन बुधवारी दुपारी पोलिसांसोबत परिसराची पाहणी केली. तसेच येथे बनविण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्वॅब स्टिकचा वापर आपल्या शहरात केला जात नसल्याची प्रतिक्रिया दिली.परिसराची पाहणी केल्यानंतर अन्न औषध व प्रशासन विभागाशी संपर्क साधून कारवाई करण्याची लेखी सूचना केली. झोपडपट्टी भागात कोणत्याही सुरक्षेविना स्टिकचे पॅकिंग होतेच कसे, याची माहिती अन्न औषध व प्रशासन विभागासह स्थानिक महापालिका प्रशासन व पोलिसांना का नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यादव यांच्यावर महिलांचा रोषज्ञानेश्वरनगरमधील काही घरांत आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्टिक कोणत्याही सुरक्षेविना पॅक करत असल्याचा प्रकार एका यादव नावाच्या व्यक्तीने सुरुवातीला उघड केला. या यादवच्या घरावर कोरोना टेस्टिंग स्वॅब स्टिक बनविणाऱ्या संतप्त महिलांनी घेराव घालून ऐन कोरोनाकाळात रोजगार हिराविल्याचा आरोप केला. त्यांना आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्टिकबाबत काहीएक माहिती नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याउल्हासनगर