अजूनही १५ वॉण्टेड !

By admin | Published: October 1, 2015 03:07 AM2015-10-01T03:07:03+5:302015-10-01T03:07:03+5:30

मुंबईत नऊ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांतील १२ आरोपींना बुधवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली असली, तरी या प्रकरणातील १५ वॉण्टेड आरोपी तपास यंत्रणांना अद्यापही चकवा देत आहेत,

Still 15 Wanted! | अजूनही १५ वॉण्टेड !

अजूनही १५ वॉण्टेड !

Next

मुंबईत नऊ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांतील १२ आरोपींना बुधवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली असली, तरी या प्रकरणातील १५ वॉण्टेड आरोपी तपास यंत्रणांना अद्यापही चकवा देत आहेत, हे विसरून चालणार नाही. अबू जुंदालला पकडण्याची जशी संधी आली तशी संधी पुन्हा आली तर आणि तरच आता हे आरोपी पकडले जाऊ शकतात, असे मत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मुंबईत ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही हे प्रकरण येथेच थांबत नाही. कारण या प्रकरणातील १५ वॉण्टेड आरोपींना पकडण्याचे खरे आव्हान पोलिसांपुढे आहे. यातील चार जण भारतीय, तर ११ आरोपी पाकिस्तानी आहेत. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अझम चिमा यातील प्रमुख एक आहे. चार भारतीयांमध्ये प्रामुख्याने हफीज झुबेर याचा समावेश आहे. हफीज हा मूळचा बिहारमधील मधुबनीचा रहिवासी आहे. फैजल शेखने त्याला ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठविले होते. अन्य आरोपींमध्ये सोहेल उस्मान गनी शेख याचा समावेश आहे. मुलुंडमधील स्फोटाप्रकरणी हा पोलिसांना हवा आहे. ७/११ च्या स्फोटानंतर तो पाकिस्तानात पळून गेला आहे. अन्य दोन भारतीय आरोपींमध्ये राहील शेख आणि रिझवान डावरे हे आहेत. या दोघांनी स्फोट घडवून आणण्यासाठी हवालामार्फत पैसा पाठविला होता.
------------
एका अधिकाऱ्याने
सांगितले, की यातील बहुतांश आरोपी हे पाकमध्ये आहेत. तथापि यांना पकडण्यासाठी आम्ही लंडन, सौदी अरेबिया व नेपाळमध्येही नजर ठेवून आहोत. एटीएसने 2010 मध्ये राहील शेखला इंटरपोलच्या साहाय्याने पकडले तेव्हा मोठा आरोपी पकडल्याचे समाधान होते; पण प्रत्यक्षात हे प्रकरण वेगळे निघाले.
-----------
चा आरोपी आणि औरंगाबादजवळील शस्त्रास्त्र साठा प्रकरणातील आरोपी जबीउद्दीन अन्सारीला पकडण्यात जसे यश आले तसेच यश इतर आरोपींच्या बाबतीत येईल, अशी यंत्रणेला आशा आहे.
---------
मोहम्मद
फैजल शेख
लष्कर-ए-तोयबाचा मुंबईचा मुख्य पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देणारा आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इन चीफ आझम चिमासाठी काम केले. चिमाच्या आदेशावरूनच फैजलने त्याचा भाऊ मुझम्मील, डॉ. तन्वीर अन्सारी, सोहेल शेख, जमीर शेख यांना तेहरानमार्गे पाकिस्तानला पाठवले.
फरारी आरोपी रिझवान दावरे आणि त्याचा भाऊ राहील यांच्या मदतीने कट प्रत्यक्षात उरतवण्यासाठी हवालाद्वारे पैसे मिळवले.
मुख्य आरोपी असीफ खान बशीर खान याच्याइतकीच जबाबदारी फैजलवर होती
पाकिस्तानी अतिरेकी
सलीम, सोहेल शेख, अब्दुल रझाक, अबू उमेद यांना त्याच्या घरात आश्रय दिला.
बॉम्बस्फोटासाठी याच्या वांद्रे येथील घरात बैठक झाली.
मोहम्मद अलीच्या घरी बॉम्ब आणून ठेवण्यास मदत केली.
-------
एक आयपीएस अधिकारी म्हणाले, की जे आरोपी ९ वर्षांपासून फरार आहेत त्यांना पकडणे एवढे सोपे नाही. पाळत ठेवली जाऊ शकते, म्हणून ते एकमेकांच्या संपर्कातही नसतील. सर्वांना एकदम पकडणे शक्य नसले तरी एकेका आरोपीला पकडले जाऊ शकते.

Web Title: Still 15 Wanted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.