...तरीही मिळाले दहा हजारच
By admin | Published: November 16, 2016 05:13 AM2016-11-16T05:13:56+5:302016-11-16T05:13:56+5:30
एकीकडे बँक खातेदाराला एका आठवड्यात १० हजारांऐवजी २४ हजार रुपये काढण्याची मुभा रिझर्व बँकेने दिली आहे. तर दुसरीकडे ठाण्यात बँक आॅफ इंडियाच्या शाखांनी
जितेंद्र कालेकर/ ठाणे
एकीकडे बँक खातेदाराला एका आठवड्यात १० हजारांऐवजी २४ हजार रुपये काढण्याची मुभा रिझर्व बँकेने दिली आहे. तर दुसरीकडे ठाण्यात बँक आॅफ इंडियाच्या शाखांनी मात्र अशी नियमावली आपल्यापर्यंत आलीच नसल्याचा दावा करून मंगळवारी आलेल्या ग्राहकांना केवळ दहा हजार रुपयेच दिल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यापुढे जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा नव्या नोटांमध्ये बदली करण्याची मर्यादा चार वरुन साडे चार हजार रुपये केली आहे. एटीएम (अॅटोमेटीक ट्रेलर मशिन) मधूनही पैसे काढण्याची मर्यादा दोन हजारांवरुन अडीच हजार रुपये झाली. तसेच धनादेशाद्वारे खात्यातून रोकड काढणाऱ्यांना पूर्वी एका आठवड्यात दहा हजारांची मर्यादा ठेवली होती. ती आता दहा हजारांवरुन २४ हजार रुपये करण्यात आली आहे.