अजूनही शाबूत आहे मुंबईत माणुसकी... अभिनेता कैलाश वाघमारेचा अनोखा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:36 AM2017-09-08T03:36:54+5:302017-09-08T03:37:30+5:30

आजकाल माणुसकी विस्मृतीत गेली आहे की काय, असे वाटावे अशा काही घटना सभोवती घडताना दिसत असतानाच, माणुसकीच्या झ-याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे.

Still in the mood of Mumbai ... the unique experience of actor Kailash Waghmare | अजूनही शाबूत आहे मुंबईत माणुसकी... अभिनेता कैलाश वाघमारेचा अनोखा अनुभव

अजूनही शाबूत आहे मुंबईत माणुसकी... अभिनेता कैलाश वाघमारेचा अनोखा अनुभव

राज चिंचणकर 
मुंबई : आजकाल माणुसकी विस्मृतीत गेली आहे की काय, असे वाटावे अशा काही घटना सभोवती घडताना दिसत असतानाच, माणुसकीच्या झ-याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक; तसेच ‘मनातल्या उन्हात’, ‘भिकारी’ असे चित्रपट गाजवणारा अभिनेता कैलाश वाघमारे याच्या बाबतीत ही घटना घडली असून, ती सकारात्मक विचार करायला लावणारी आहे.
अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मीटिंगसाठी जात असताना चुकून उघड्या राहिलेल्या कैलाशच्या बॅगच्या चेनमुळे त्याचे पैशांचे पाकीट लांबवले गेले. परिणामी एटीएम, आधार, निवडणूक ओळखपत्र अशा सगळ्याच कार्डांनी पैशांसोबत त्याची संगत सोडली. त्यातच नजरचुकीने एटीएम कार्डच्या पाकिटात त्याचा कोड नंबरही लिहिलेला होता. या प्रकारानंतर त्याचा मोबाइल वाजला की एटीएममधून कुणीतरी पैसे काढल्याचाच तो मेसेज असणार, अशी धास्ती कैलाशला वाटू लागली.
दुसºया दिवशी, मंगळवारी त्याच्या फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये त्याचे पाकीट सापडल्याचा मेसेज येऊन पडला आणि कैलाशला धक्काच बसला. त्यात दिलेल्या फोन नंबरवर कैलाशने संबंधितांशी संपर्क साधला आणि तो वर्सोवा मेट्रो स्टेशनवर त्यांना भेटायला गेला. तिथे तिघे त्याची वाट पाहत होते. मुंबईत रंगकाम करणारे ब्रिजमोहन, वर्मा आणि राजकुमार असे हे अनोळखी तिघे त्याला भेटले व त्यांनी कैलाशचे सापडलेले पाकीट परत केले. ‘तुमचा फोन आला नसता, तर आम्ही हे सर्व तुमच्या पत्त्यावर पाठवणार होतो,’ असेही ते म्हणाले. या सगळ्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. अखेर त्यांना धन्यवाद देत कैलाशने पाकीट परत घेतले आणि मूळचा जालन्याचा हा युवा अभिनेता मुंबईच्या या अनुभवाने थक्क झाला.
या घटनेने मी आश्चर्यचकितच झालो आहे. त्या तिघांनी मला माझे पाकीट परत करताना ‘नीट पाहून घ्या तुमचे पाकीट,’ असेही वर सुचवले. काय बघणार होतो मी पाकीट? माणुसकीच शाबूत होती या गजबजल्या शहरात! या सगळ्यामुळे माझा माणसांवरचा विश्वास अधिकच वाढला आहे.
- कैलाश वाघमारे, अभिनेता

Web Title: Still in the mood of Mumbai ... the unique experience of actor Kailash Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई