डोंबिवली/कल्याण : विठ्ठलवाडी स्थानकाजवळ अपघाताच्या ठिकाणी वेगमर्यादा कायम असल्याने मध्य रेल्वेची कर्जत दिशेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत होती. लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकाला त्याचा फटका बसला. अपघातग्रस्त भागात बदललेले रूळ, स्लिपर्स, तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले खांब आणि ओव्हरहेड वायरमुळे लोकल, मेल-एक्स्प्रेसचा वेग सध्या ताशी २० किमी इतकाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तेथून जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकाला त्याचा फटका बसला. त्या १५ मिनिटे ते अर्धा तास उशिराने धावत होत्या. आणखी दोन दिवस अशी स्थिती राहील, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. अपघाताच्या ठिकाणी अजूनही ओव्हरहेड वायर, रेल्वे रुळांचे काम सुरू आहे. दरम्यान, अपघात झालेल्या लोकलचे डबे अंबरनाथ स्थानकात आणण्यात आले होते. ते रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये न्यायचे की कुर्ल्याच्या याचा निर्णय दुपारपर्यंत झालेला नव्हता. (प्रतिनिधी)
अजूनही ‘मरे’ची वाहतूक विस्कळीतच
By admin | Published: December 31, 2016 2:43 AM