अजूनही प्लॅस्टिक वापरताय... सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:29 AM2018-03-29T02:29:40+5:302018-03-29T02:29:40+5:30

राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईत प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिकेने तयारी सुरू केली

Still using plastic ... be careful! | अजूनही प्लॅस्टिक वापरताय... सावधान!

अजूनही प्लॅस्टिक वापरताय... सावधान!

Next

मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईत प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी नेमलेले कर्मचारी विविध ठिकाणी धाड टाकून पिशव्या जप्त करणे, संबंधितांना दंड करणे अशी कारवाई करणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी दिली.
राज्य सरकारने प्लॅस्टिक वापरावर मर्यादा आणल्याने त्यानुसार कारवाईची रूपरेषा ठरविण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी अधिकाºयांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी, सहायक आयुक्त (बाजार) संगीता हसनाळे व महापालिकेचे कायदा अधिकारी जेरनॉल्ड झेवियर उपस्थित होते. कारवाई करणाºया पथकातील कर्मचाºयांची निवड करणे तसेच त्यांची कर्तव्यसूची तयार करण्याची जबाबदारी निधी चौधरी यांना सोपविण्यात आली आहे. प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केली जात असताना कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. या कर्मचाºयांनी आपल्या पोशाखावर ‘नेम प्लेट’ लावणे तसेच कारवाईदरम्यान, कर्तव्यावर असताना प्रत्येकवेळी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे, तसेच धाड टाकण्यास जाण्यापूर्वी वरिष्ठांना पूर्वकल्पना देणे कर्मचाºयांना बंधनकारक आहे.
स्वतंत्र वेबपेज
कापडी व कागदी पिशव्या तयार करणाºया व्यक्ती, संस्था, समूह यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ‘वेबपेज’ तयार करून माहिती देण्यात येईल. इच्छुकांनी सहायक आयुक्त (नियोजन) यांच्याशी ८२-९१६५-२९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्लॅस्टिक बंदी राबवित असतानाच घरात असलेल्या प्लॅस्टिकचे काय करावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावू शकतो. हे लक्षात घेऊन प्लॅस्टिक जमा करण्याच्या दृष्टीने मंडया, सार्वजनिक ठिकाणे इत्यादींच्या परिसरात कलेक्शन बीन ठेवण्यात येणार आहेत.

प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय ठरणाºया कापडी व कागदी पिशव्या मुंबईकरांना उपलब्ध करून देणे; तसेच कापडी व कागदी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देण्याचेही महापालिकेने ठरविले आहे. महिला बचत गटांच्या सहकार्याने या पिशव्या तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
महापालिकेच्या मंडयांमध्ये कापडी व कागदी पिशव्या सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने मंडयांमध्ये गाळे उपलब्ध असल्यास तेथे कापडी, कागदी पिशव्या विकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मोठ्या सोसायट्यांमधील रहिवाशांना कापडी व कागदी पिशव्या सहजपणे उपलब्ध होण्यासाठी सोसायटीमध्येच व्यवस्था करण्याची परवानगी
तत्काळ मिळणार आहे.

Web Title: Still using plastic ... be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.