शेअर बाजारात पडझड सुरूच

By admin | Published: June 20, 2014 11:44 PM2014-06-20T23:44:07+5:302014-06-20T23:44:07+5:30

शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुस:या दिवशी घसरणीचा सिलसिला सुरू राहिला.

Stock markets start declining | शेअर बाजारात पडझड सुरूच

शेअर बाजारात पडझड सुरूच

Next
>मुंबई : शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुस:या दिवशी घसरणीचा सिलसिला सुरू राहिला. पडझडीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन आठवडय़ांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.
शेअर बाजारातील घसरणीला इराकमधील भू-राजकीय संकट आणि कमजोर मान्सूनची शक्यता या दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. बाजारातील पडझडीचा फटका महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा पॉवर आणि आयसीआयसीआय बँक यांना प्रामुख्याने बसला. या कंपन्यांचे शेअर्स खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा 30 कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित सेन्सेक्स दिवसभर खाली-वर होत होता. सुरुवातीला तेजीत असलेला सेन्सेक्स एका क्षणी 25,276.31 अंकांवर गेला होता. नंतर मात्र तो कोसळत गेला. दिवस अखेरीस 96.29 अंकांची अथवा 0.38 टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स 25,105.51 अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Stock markets start declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.