साठ लाखांची चार कर्णफुले चोरीला; मोलकरीण आणि नोकरावर संशय, गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:50+5:302021-03-15T04:06:50+5:30
मुंबई : प्रभादेवी येथील एका व्यावसायिकाच्या घरातून ६१ लाख ५० हजार रुपये किमतीचे डायमंडचे कानातले आणि बांगड्या चोरीला ...
मुंबई : प्रभादेवी येथील एका व्यावसायिकाच्या घरातून ६१ लाख ५० हजार रुपये किमतीचे डायमंडचे कानातले आणि बांगड्या चोरीला गेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. यामध्ये, घरातील मोलकरीण आणि नोकरानेच यावर हात साफ केल्याचा संशय वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार दादर पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रभादेवी परिसरात ४५ वर्षीय तक्रारदार महिला राहण्यास आहे. त्यांचे पतीची खासगी कंपनी आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी जेवण बनविण्यासाठी ३० वर्षीय राजेश नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवले, तर घरकामासाठी नुकतेच आणखीन एका तरुणीला कामावर ठेवले. पुढे नोकर आणि मोलकरणीच्या अश्लील वर्तनामुळे त्यांना कामावरून काढले.
त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी तक्रारदार या कामासाठी बंगलोर येथे गेल्या. जाण्यापूर्वी घरातील दागिन्याची पाहणी त्यांनी केली होती. त्यानंतर, १० मार्च रोजी घरी परतल्यानंतर एका कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांनी दागिन्याची पाहणी केली. यात, ६० लाख किमतीचे सॉलिटेअर डायमंडची चार कर्णफुले आणि दीड लाख किंमतीच्या दोन बांगड्या यात चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यात त्यांच्या बेडरूमच्या सफाईसाठी मोलकरणीशिवाय अन्य कोणी येत नव्हते. तसेच तिला चावीबाबत माहिती होती. मोलकरणीने नोकराच्या मदतीने ही चोरी केल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे वर्तवला आहे. त्यानुसार, दादर पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
....