30 लाख डेबिट कार्डमधील माहिती चोरीस? बँक ग्राहकांची चिंता वाढली

By admin | Published: October 20, 2016 01:27 PM2016-10-20T13:27:54+5:302016-10-20T15:45:05+5:30

देशभरातील विविध बँकांच्या सुमारे 30 लाख डेबिट कार्डमधील गोपनीय माहिती आणि पिन चोरण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Stolen information on 30 million debit cards? The concerns of bank customers increased | 30 लाख डेबिट कार्डमधील माहिती चोरीस? बँक ग्राहकांची चिंता वाढली

30 लाख डेबिट कार्डमधील माहिती चोरीस? बँक ग्राहकांची चिंता वाढली

Next
> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 -  एटीएम कार्डचे क्लोनिंग करून गैरव्यवहार सुरू असल्याचे उघडकीस आल्यावर एसबीआयने 6 लाख डेबिट कार्ड ब्लॉक करून एक दिवस उलटत नाहीत तोच देशभरातील विविध बँकांच्या सुमारे 30 लाख डेबिट कार्डमधील गोपनीय माहिती आणि पिन नंबर चोरण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सीस,येस बॅंक या बॅंकांच्या डेबिट कार्डचा समावेश आहे. हे डेबिट कार्ड अशा एटीएममध्ये वापरण्यात आले होते जेथून घुसखोरी करत संबंधित माहिती चोरण्यात आली आहे. 
 
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने ब्लॉक केलेल्या सहा लाख डेबिड कार्डधारकांना नव्याने डेबिट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर बँकांनीही आपल्या ग्राहकांना एटीएम पीन बदलण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पिनशिवाय होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहारही बंद करण्यात आले आहेत. 
 
(सहा लाख डेबिट कार्ड ब्लॉक)
 
येस बँकेसाठी एटीएम नेटवर्क चालवणा-या 'हिताची पेमेंट सर्व्हिस'शी संबंधित असलेल्या एटीएमचा वापर करणाऱ्या डेबिट कार्डधारकांचे पिन चोरीस गेले आहेत. हा प्रकार 7 जुलै रोजी पहिल्यांदा उघडकीस आला होता. मात्र बँकेच्या एटीएममध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. इतर बँकांच्या तुलनेत येस बँकेचे एटीएम नेटवर्क लहान आहे. मात्र ग्राहकांनी इतर बँकांच्या एटीएममध्ये कार्डचा वापर केल्याने ही समस्या उद्भवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
 
'प्राथमिक तपासामध्ये आमच्या प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी दिसून आलेली नाही. पण याबाबतचा अंतिम अहवाल येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. तसेच बँकांनी ग्राहकांचे डेबिट कार्ड बदलले पाहिजेत असेही मला वाटत नाही', असं 'हिताची पेमेंट सर्व्हिस'चे व्यवस्थापकीय संचालक लॉनी अँटोनी यांनी सांगितलं आहे.
 
माहिती चोरी झालेल्या कार्डची संख्या मोठी असली तरी देशात असलेल्या एकूण डेबिट कार्डच्या तुलनेत हा आकडा खूप लहान आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार देशात एकूण 60 कोटी डेबिट कार्ड आहेत.    
 

Web Title: Stolen information on 30 million debit cards? The concerns of bank customers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.