तीन इमारती चोरीला?

By admin | Published: September 14, 2014 01:01 AM2014-09-14T01:01:36+5:302014-09-14T01:01:36+5:30

अंबरनाथ नगर परिषदेच्या मालकीच्या तीन धोकादायक इमारती कोणत्याही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता पाडून तेथील भंगार विकण्याचा पराक्रम नगर परिषदेच्या अधिका:यांनी केला आहे.

Stolen three buildings? | तीन इमारती चोरीला?

तीन इमारती चोरीला?

Next
अंबरनाथ :  अंबरनाथ नगर परिषदेच्या मालकीच्या तीन धोकादायक इमारती कोणत्याही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता पाडून तेथील भंगार विकण्याचा पराक्रम नगर परिषदेच्या अधिका:यांनी केला आहे. या इमारती पाडल्याची कोणतीही नोंद नसल्याने त्या चोरीला गेल्या की काय, असा प्रश्न माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी अधिका:यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
अंबरनाथ नगर परिषदेच्या मालकीचे वेल्फेअर सेंटर, नर्सेस क्वार्टर्स आणि मदनसिंग मनवरसिंग खुले नाटय़गृह या इमारती मोडकळीस आल्या होत्या त्यांचे स्ट्ररल ऑडिट केले असता त्या धोकादायक ठरवण्यात आल्या. या इमारती पाडताना सभागृहाची मंजुरी मिळवणो, पाडण्यासाठी निविदा मागवणो आवश्यक होते. मात्र, तसे न करताच तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरी, उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर आणि तत्कालीन सहायक नगररचनाकार कु.का. धरणो यांनी अधिकारांचा गैरवापर करून इमारती पाडल्या. त्यातील भंगार परस्पर विकले.  याची नोंद नसल्याने त्या चोरीला गेल्या की काय, असा प्रश्न उपस्थित करून माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी या प्रकरणी अधिका:यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे केली आहे. 
 जी इमारत धोकादायक ठरवली आहे, तिच्या खाली असलेले आठ व्यापारी गाळे या अधिका:यांनी आर्थिक व्यवहार करून तसेच ठेवल्याचा आरोपही करंजुले यांनी केला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरी यांची बदली आता दुस:या राज्यात झाली आहे. उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर यांना ही कारवाई झाल्यावर लागलीच लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तिसरा अधिकारी कु. का. धरणो याचीही बदली झाली आहे. 
 
च्तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरी, उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर आणि सहायक नगररचनाकार कु.का. धरणो यांच्यावर अरोप
च्गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली कारवाईची मागणी

 

Web Title: Stolen three buildings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.